HDFC Bank | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.  बँकेच्या काही सेवा 28 तासांसाठी बंद राहणार आहेत. यामुळे नेट आणि मोबाईल बँकिंगवर (Net & Mobile Banking) ग्राहकांना काही सुविधा मिळू शकणार नाहीत. आज, 7 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून 8 ऑगस्ट रात्री 10 वाजेपर्यंत या सेवा बंद राहतील. शेड्युल्ड मेटनन्स (Scheduled Maintenance) साठी या सेवा बंद राहणार असून याबद्दल बँकेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती बँकेने ई-मेलद्वारे आपल्या ग्राहकांना दिली आहे. यात एचडीएफसी बँकेचे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अॅप्सवरुन काही सेवांचा लाभ घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. कोणत्या आहेत या सेवा? जाणून घेऊया...

सेवा बंद असलेल्या कालावधीत मोबाईल किंवा नेट बँकिंगवरुन क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पाहता किंवा  डाऊनलोड करता येणार नाही. त्याचबरोबर 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12.30 ते सकाळी 6.30 पर्यंत ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित कोणतीही सेवा घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा लाभ घेणाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. (HDFC Bank ग्राहकांसाठी सूचना; फसवणूक टाळण्यासाठी ॲप डाऊनलोड करताना घ्या 'अशी' काळजी)

दरम्यान, एचडीएफसी बँकेने Cardless Cash ची सुविधा सुरु केली आहे. याद्वारे एटीएम कार्ड नसतानाही तुम्हाला एचडीएफसी बँकेतून 24X7 रोख रक्कम काढता येईल. एटीएम/डेबिट कार्डशिवाय अत्यंत सुरक्षित मार्गाने पैसे काढता येतील, असे एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.