PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारने eKYC साठी वाढवली मुदत; 'ही' आहे नवीन डेडलाईन
Indian Farmers | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

PM Kisan Samman Nidhi Yojana: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आत्तापर्यंत अनिवार्य eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 मे 2022 होती. पीएम किसान वेबसाइटवरील फ्लॅशनुसार, "सर्व PMKISAN लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे."

दरम्यान, 31 मे 2022 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत आर्थिक लाभांचा 11 वा हप्ता जारी केला. पीएम-किसान योजनेंतर्गत, प्रत्येक जमीनधारक शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. (हेही वाचा - PAN-Aadhaar Linking: जून महिन्याच्या अखेरीपर्यंत आधार-पॅन लिंकिंगचं काम करा पूर्ण अन्यथा भरावा लागेल दुप्पट दंड!)

eKYC कसे करावे?

  • यासाठी, प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राउझरच्या क्रोम सारख्या आयकॉनवर टॅप करा आणि तेथे pmkisan.gov.in टाइप करा.
  • आता तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुख्यपृष्ठ मिळेल, त्याच्या तळाशी जा आणि तुम्हाला ई-केवायसी लिहिलेले दिसेल. यावर टॅप करा आणि तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर टॅप करा.
  • आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल. प्रदान केलेल्या बॉक्समध्ये ते टाइप करा.
  • यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी बटण टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. ते भरा आणि सबमिट वर टॅप करा.

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमचं eKYC पूर्ण होईल. किंवा काही त्रृटी असल्यासं ते Invalid असं दाखवेल. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश दिसेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आणखी 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.