Goldsmith कडून लाखो रुपये लुटले, आरोपींना अटक
फोटो सौजन्य - फाइल फोटो

पुण्यामध्ये सोनाराला लुटणाऱ्या एका 5 जणांच्या टोळीला कोतवली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या टोळीने सोनाराकडून लाखो रुपये उकळले आहेत.

संजीत मंडल असे या सोनाराचे नाव आहे. त्यांचे पुण्यातील रेणावीकर मार्केटमध्ये सोन्याचे दुकान आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद करुन भाचा आणि संजीत मंडल हे दोघे निघाले होते. त्यावेळी दोन दुचाकींवरुन आलेल्या दरोडेखोरांनी त्यांना मारहाण आणि त्यांच्याकडील सोने लुटल्याचा प्रकार घडला आहे. तर दरोडेखोरांनी लुटुन झाल्यानंतर पळ काढला आहे. या प्रकरणी संजीत यांनी पोलिसात गुन्ह्याची नोंद केली.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने या प्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.