प्रवासावेळी महामार्गांवर लागणाऱ्या टोलनाक्यावर पैसे भरण्यासाठी वाहतूकीच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. त्यामुळे आता काही कंपन्यांनी वाहनचालकांचा टोल भरण्याचा वेळ वाचवण्यासाठी फास्टटॅग हा पर्याय आणला आहे. त्यामुळे फास्टटॅगच्या (Fastag) सहाय्याने तुमचा टोल कापला जाणार आहे.
वाहनांची महामार्गांवर टोलनाक्यावरील टोल भरण्यासाठी वाढती गर्दी पाहता फास्टटॅगचा उपयोग करा असे आवाहन करण्यात आले होते. तर शुक्रवारी परिवहन मंत्रालयाने येत्या 30 नोव्हेंबर नंतर ज्या वाहनचालकाकडे फास्टटॅग नसल्यास त्याला टोल दुप्पट किंमतीने भरावा लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत या संबंधित एक पत्र राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे टोलसंबंधित जाहीर करण्यात आलेल्या आदेशाचे पालन प्रत्येकाने करावे असे आवाहन करण्यात आले आहे.(टोल नाक्यावर पैसे भरण्याचा त्रास वाचवण्यासाठी Amazon ने आणला फास्टटॅग, बँकेसोबत लिंक करता येणार)