प्रवासादरम्यान लागणाऱ्या टोल नाक्यावर पैसे भरण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. तसेच टोल भरण्यासाठी काही वेळ तिथेच थांबावे लागते. मात्र आता अॅमेझॉनने (Amazon) टोल नाक्यावर पैसे भरण्याचा त्रास वाचवण्यासाठी फास्टटॅग (Fastag) आणला आहे. या फास्टटॅगच्या सहाय्याने तुमचा टोल नाक्यावरील शुल्क कापला जाणार आहे.
फास्टटॅग आता ऑनलाईन पद्धतीने अॅमेझॉनवरुन खरेदी करता येणार आहे. तर चारचाकी वाहनांसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी हा फास्टटॅग ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच फास्टटॅग खरेदी केल्यानंतर तुम्ही ते बँक अकाउंटसोबत लिंक करु शकता. जेणेकरुन ज्यावेळी तुम्ही टोल नाक्याच्या येथून प्रवास करणार असाल त्यावेळी तुमचा टोल फास्टटॅगच्या माध्यमातून आपोआपच बँक अकाउंटमधून कापला जाईल.
फास्टटॅग बँकसोबत लिंक करण्यासाठी एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, पेटीएम पेमेंट्स, इंडसइंड बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक यांचा उपयोग करु शकता. त्याचसोबत फास्टटॅग तुम्हाला रिचार्ज सुद्धा करता येणार आहे. मात्र फास्टटॅगसाठी वाहनाचे सर्टिफिकेट (RC), चालकाचा फोटो आणि चालकाचे ओळख पत्र दाखवून खरेदी करता येणार आहे. तसेच फास्टटॅग क्रेडिट, डेबिट किंवा नेट बँकिंगच्या सहाय्याने रिचार्ज करता येणार आहे.