FASTag: प्रवासादरम्यान हायवे टोल नाक्यांवर सलवत मिळविण्यासठी फास्टॅग अनिवार्य
FASTag, Toll Plaza | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

तुम्ही कोणत्याही हायवेवरुन प्रवास करत असा. तुम्हाला टोल नाक्यावर (Toll Plaza) जर सवलत हवी असेल तर तुमच्याकडे फास्टॅग (FASTag) असणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारने मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाहनधारकाला कोणत्याही टोलनाक्यावर कोणत्याही प्रकारची सवलत मिळविण्यासाठी फास्टॅग बंधनकारक (FASTag Is Mandatory) आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Road And Transport Ministry) राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर व संकलन निर्धारण) नियम 2008 मध्ये मंगळवारी ( 25 ऑगस्ट 2020) दुरुस्ती केली. या दुरुस्तीनुसार 24 तासात त्याच मार्गाने परत येणाऱ्या वाहनधारकांना आणि स्थानिक वाहनधारकांना करसवलत मिळणार आहे. ही सवलत घेण्यासाठी संबंधित वाहनधारकांकडे फास्टॅग असणे अनिवार्य आहे. फास्टॅग धारकांना प्रवासादरम्यान टोलनाक्यांवर करसवलत मिळू शकते.

राष्ट्रीय महामार्गांवरुन प्रवास करताना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट प्रक्रिया वापरास प्रोत्साहन देण्यासाठी काही नियमांत सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच काही नव्या नियमांचासमावेश करण्यात आला आहे. या आधी राष्ट्री महामार्गांवरुन प्रवास करताना आणि त्याच मार्गावरुन परतत असताना टोल सवलत मिळविण्यासाठी पावतीची आवश्यकता भासत असे. फास्ट टॅग प्रणालीमुळे पावतीची आवश्यकता भासणार नाही. तसेच, डिजिटल पेमेंट केल्याने चलनी व्यवहारही होणार नाहीत, असे एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले.

फास्टॅगद्वारे केले जाणारे कोणतेही पेमेंट हे डिजिटल पेमेंटच्या स्वरुपात कोणत्याही पद्धतीने स्वीकारली जाईल. तसेच 24 तासांच्या आत परतीचा प्रवास करणाऱ्या कोणत्याही वाहनास डिजिलट रेकॉर्ड राहिल्याने आपोआपच सुट मिळू शकणार आहे. (हेही वाचा, भारतात वाहन नोंदणीसाठी FASTag अनिवार्य, सरकारकडून नियमात ही बदल)

फास्टॅग ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेटीफिकेशन स्टिकर आहे. प्रामुख्याने वाहनाच्या विडंस्क्रीनवर लावले जाते. जे टोल नाक्यावर स्वयंचलीतपणे वाहनाची ओळख देते. तसेच, डिजिडटल पेमेंटच्या माध्यमातून टोल कपात करण्यास मान्यता देते. टॅग डिजिटल पेमेंटस प्रोत्साहित करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी आणि टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी सादर करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या राष्ट्रीय महामार्गांवरील दोन्ही बाजूस फास्टॅग आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच, येत्या 15 डिसेंबर पर्यंत सर्व टोलनाक्यांवर सर्व लेन फास्टॅग लेन म्हणून घोषीत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक टोल नाक्यावरील चौथी लेन ही रोख रक्कम आणि फास्टॅग पेमंटसाठी काहीशी शिथिलता आहे. ज्याची मुदत 15 जानेवारीपासून संपणार आहे.