शेतकरी आणि आदिवासी यांचा मोर्चा मुंबईत दाखल
मोर्चा ( फोटो सौजन्य - फेसबुक )

शेतकरी आणि आदिवासी यांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी 50 हजारहून जास्त लोकांनी मोर्चा काढला. तसेच मागण्या पूर्ण होण्यासाठी या लोकांनी ठाणे पासून ते मुंबई पर्यंत पायी जाण्याचे ठरविले होते.

मात्र मोर्चा आता मुंबईच्या दिशेला येऊन धडकला आहे. तर मोर्चामधील लोक जोरजोरात घोषणा करुन आझाद मैदानाच्या दिशेने पुढे सरकत आहेत. या शेतकऱ्यांनी आणि आदिवासी यांनी हा मोर्चा मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले आहे. तर उद्या हा मोर्चा उद्या थेट आझाद मैदानावर धडकणार आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई लवकरात देण्यात यावी. तसेच वनविधायक कायद्याची अंमलबजावणी करुन आदिवासींच्या नावावर जमिनी करव्यात अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जात आहेत.