Nykaa Founder Falguni Nayar: नायका कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर ठरल्या भारतातील पहिल्या सेल्फ-मेड महिला अब्जाधिश
Falguni Nayar | (Photo Credit - Twitter)

नायका (Nykaa) कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर (Falguni Nayar) या भारतातील पहिल्या सेल्फ मेड अब्जाधीश (India's First Self-Made Female Billionaire) ठरल्या आहेत. ब्यूटी आणि पर्सनल केयर सेगमेंट मध्ये काम करणाऱ्या दिग्गज नायका कंपनीचा आयपीओ (IPO) शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला. कंपनीचे शेअर मार्केटमध्ये पदार्पण जोरदार आणि धमाकेदार राहिले. इतके की कंपीनेच मार्केट कॅपीटलायजेशन 1 लाख कोटी रुपयांच्याही पार गेले. इतकेच व्हे तर , फाऊंडर फाल्गुनी नायर यांचा श्रीमंतांच्या यादीतही समावेश झाला.

फाल्गुनी नायर यांच्याकडे कंपनीचे जवळपास 50% पेक्षा अधिक आहेत. ज्याची किंमत 6.5 बिलीयन डॉलर इतकी आहे. Bloomberg Billionaires Index ने दिलेल्या माहितीनुसार, नायर या आजच्या आयपीओ लिस्टिंगनंतर भारतातील सर्वात श्रीमंत सेल्फ-मेड महिला अब्जाधिश ठरल्या आहेत. नायकाची पॅरेंटींग कंपनी FSN E-Commerce Ventures स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाल्यानंतर पहिली अशी युनीकॉर्न कंपनी आहे, जिचे नेतृत्व महिलेच्या हातात आहे.

नायकाचा आयपीओ तीन दिवसांसाठी उघडण्यात आला होता आणि 1 नोव्हेंबरला बंद झाला होता. आयपीफोमध्ये ऑफरला 82 पटींनी सब्सक्राईब करण्यात आले. कंपनीचे 2,64,85,479 समभागांच्या ऑफरवर 2,16,59,47,080 समभागांचे बिडींग आले. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 5,352 कोटी जमा केले.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज नायकाचे शेअर 2,001 रुपये प्रति शेयर दराने उघडले. हीच किंमत सुरुवातीच्या दराच्या 78% अधिक आहे. नॅशनल स्टॉक एक्चेंजवर कंपनीचे शेअर इशू प्राईजच्या 79% अधिक म्हणजे 2,018 रुपये प्रति शेयर च्या रेटने ट्रेडिंगसाठी उघडले.

फाल्गुनी नायर यांनी एका टॉप निवेश बँकेचे नेतृत्व केले आहे. त्यांनी 2012 मध्ये नायके कंपनीची सुरुवात केली. त्या वेळी देशात असे कोणतेच व्यासपीठ नव्हते. जे केवळ ब्यूटी आणि पर्सनल केयर प्रॉडक्ट्स खरेदीसाठी महिलांना पर्याय उपलब्ध करुन देईल. याची सुरुवात ऑनलाईन मार्केटप्लेसमधून झाली. त्यानंतर त्यांनी आपला स्वत:चा ब्यूटी अँड पर्सनल केअर ब्रांड बाजारात उतरवला. सोबतच फॅशन सेकमेंट आणि रिटेल सेक्टरमध्येही जागा बनवली. नायिकाचे ब्यूटी आणि पर्सनल केयरसाठी Nykaa चे एक प्रायमरी अॅप आहे. याशिवया Nykaa Fashion ही आहे. इते एपरेल, एसेसरीज, फॅशन याच्याशी संबंधीत उत्पादने आहेत.