How To Exchange Two Thousand Rupee Note: चलनात असलेली 2000 रुपये किमतीची नोट परत घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच जारी केला. आरबीआयने स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, नोट परत घेण्याचा निर्णय म्हणजे नोटबंदी (Denomination) नव्हे. केवळ ही नोट चलनात ठेवली जाणार नाही इतकेच. दरम्यान, तुच्याकडे जर दोन हजार रुपयांच्या नोटा असतील आणि त्या जर तुम्हाला बदलायच्या असतील तर काय कराल? अनेकांसमोर प्रश्न आहे की, त्यासाठी अर्ज, ओळखपत्राचा पुरावा देणे आवश्यक आहे काय? स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) तुमच्या प्रश्नाचे उत्तर आगोदरच देऊन टाकले आहे. दोन हजारांच्या नोटेसंदर्भात असलेल्या अनेक शंकाकुशंकांना पूर्णविराम देत एसबीआयने (SBI) त्यांच्या सर्व शाखांना एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
किती रुपयांपर्यंत सहज बदलात येऊ शकतील नोटा
एसबीआयने त्यांच्या सर्व शाखांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, ₹ 2,000 च्या नोटांची देवाणघेवाण करताना किंवा जमा करताना कोणताही फॉर्म किंवा स्लिप आवश्यक असेल की नाही याविषयी तर्क वितर्क करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कोणत्याही अर्जाशिवाय, स्लिपशिवाय आणि ओळखपत्राशिवाय ग्राहकाला रुपये 20,000 पर्यंतच्या नोटा एका वेळी जमा करता किंवा बदलता येऊ शकतात. (हेही वाचा, RBI to Withdraw Rs 2000 Notes: चलनातून बाहेर झाल्या 2000 रुपयांच्या नोटा; तात्काळ प्रभावाने ग्राहकांना देणे बंद करण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश)
सोशल मीडियावरील दावे चुकीचे
दोन हजार रुपयांच्या नोटेसंदर्भात निर्णय आला तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेक दावे केले जात आहेत. हे दावे सपशेल खोटे असल्याचे एसबीआयच्या मार्गदर्शक तत्वांवरुन पुढे आले. सोशल मीडियावर सांगितले जात होते की, दोन हजार रुपयांच्या नोटा बदलताना आधार कार्ड ओळख आणि पॅन द्यावा लागेल. अर्ज करावा लागेल. परंतू, अशा कोणत्याच प्रकारचा अर्ज, ओळख देण्याची, घेण्याची आवश्यकता नसल्याचे एसबीआयच्या मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे.
मुदत संपेपर्यंत नोटा वैध आणि कायदेशीर राहतील
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की आमच्याद्वारे (आरबीआय) चलनातून ₹ 2,000 च्या नोटा काढून घेईल्या जातील. लोक त्यांच्याकडे असलेल्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत त्या बदलू शकतात किंवा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ची 19 क्षेत्रीय कार्यालये आणि इतर बँका ₹ 2,000 घेणे सुरू करतील. 23 मे पासून कमी मूल्याच्या नोटा बदलण्यासाठी. त्या कायदेशीर निविदा राहतील, असे आरबीआयने म्हटले आहे. मध्यवर्ती बँके असलेल्या आरबीआयने म्हटले आहे की हे सर्व त्यांच्या "क्लीन नोट पॉलिसी" अंतर्गत केले जात आहे.
गरज भासल्यास आरबीआय ३० सप्टेंबरपासून मुदत वाढवू शकते, परंतु सध्याच्या मुदतीनंतर कोणाकडे ₹ 2,000 ची नोट असली तरी ती वैध निविदा राहील, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
ट्विट
SBI clarifies that the facility of exchange of Rs 2000 denomination bank notes upto a limit of Rs 20,000 at a time will be allowed without obtaining any requisition slip pic.twitter.com/TP6t2n9oeJ
— ANI (@ANI) May 21, 2023
लवकरच बंद होणार्या चलनाची देवाणघेवाण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने बँकेचा ग्राहक असणे आवश्यक नाही. खाते नसलेला व्यक्ती कोणत्याही बँकेच्या शाखेत एकावेळी ₹ 2,000 च्या मर्यादेपर्यंत ₹ 2,000 च्या नोटा बदलू शकतो. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, एक्सचेंज सुविधेचा लाभ घेण्यासाठी लोकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. पुढे, बँकांना ₹ 2,000 च्या नोटा बदलून किंवा जमा करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींची गैरसोय कमी करण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.