DRDO RAC Recruitment 2022: शास्त्रज्ञ पदावर 56 जणांसाठी नोकरभरतीचं नोटिफिकेशन जारी; rac.gov.in वर 28 जून पूर्वी करा अर्ज
DRDO ( Photo Credits : Facebook )

द डिफेंस रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (The Defence Research and Development Organization) अर्थात DRDO कडून Recruitment and Assessment Centreजाहीर करण्यात आली आहे. या करिता शास्त्रज्ञ पदावर पात्र आणि इच्छूक उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या जाहीर झालेल्या भरती प्रक्रियेमधून 56 जणांची नियुक्ती केली जाणार आहे. DRDO RAC नोटिफिकेशन नुसार, या नोकरभरती मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून आहे.

DRDO RAC Recruitment 2022 साठी अर्ज कसा कराल?

RACची अधिकृत वेबसाईट rac.gov.in ला भेट द्या. दरम्यान याकरिता उमेदवाराकडे मान्यतापात्र विद्यापीठाकडून फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्राशी अनुभव असणं देखील गरजेचे आहे. DRDO RAC Recruitment 2022 चे अधिकृत नोटिफिकेशन इथे पहा.

जनरल, ईडब्लूएस आणि ओबीसी पुरूष उमेदवाराला नॉन ट्रान्सफरेबल, नॉन रिफंडेबल 100 रूपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. महिला, एसटी, एससी, पीडब्ल्यूडी वर्गातील उमेदवाराला शुल्क माफ असणार आहे. हे देखील नक्की वाचा: 7th Pay Commission: जुलैपासून वाढणार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA; पगारात होणार 'इतकी' वाढ, वाचा सविस्तर .

पदांनुसार उमेदवाराची पे स्केल वेगवेगळी असणार आहे. मात्र सार्‍यांना केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार पे स्केल आणि पगार दिला जाणार आहे. किमान Rs. 67,700/ ते कमाल Rs 1,31,100/ या पे स्केल मध्ये उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, नियम व अटी सारी माहिती नीट वाचून अर्ज करावा.