प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरसमुळे देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी जाहिर केला आहे. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या संक्रमणाची सायकल तोडणे गरजेचे आहे. सोशल डिस्टंस केवळ रुग्णांसाठी नाही तर, देशातील प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाचे आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केले आहे. तर लॉकडाउनमुळे नागरिक घाबरुन खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असून अनावश्यक प्रमाणात समान घरात भरुन ठेवत आहेत. याचाच फायदा घेऊन काही दुकानमालकांनी त्यांची मनमानी सुरु केली आहे. तर ग्राहकांकडून वस्तूंच्या मुळ किंमतीपेक्षा अधिक किंमती वसूल केल्या जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा अशा गोष्टीमुळे त्रस्त असल्यास या संदर्भात घरबसल्या तुम्हाला तक्रार करता येणार आहे.

नागरिकांना काही मुलभूत हक्क असून त्यांच्यासोबत जर गैरवर्तवणूक केली जात असल्याच त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची पूर्णपणे परवानी आहे. तर सध्या देशात कोरोनाची परिस्थिती पाहता फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. त्यामुळे जर एखादा दुकानदार या काळात तुमच्या कडून वस्तूचे अधिक पैसे वसूल करत असल्यास तुम्ही 8130009809 या क्रमांकावर करुन तक्रार दाखल करु शकणार आहात. तसेच consumerhelpline.gov.in या संकेतस्थळार ऑनलाईन पद्धतीने तक्रार करता येणार आहे.

दरम्यान, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 606 वर पोहचली असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 122 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्याला 21 दिवसांत कोरोनाविरोधातील युद्ध जिंकायचे असल्याचे म्हटले आहे.