कोका-कोला (Coca-Cola) कंपनी भारतात लवकरच छास,लस्सी आणि कैरी पन्हे लॉन्च करणार आहे. तर कंपनीने यापूर्वी जलजीरा प्रोडक्ट लॉन्च केले आहे. मात्र आता येत्या उन्ह्याळ्यासाठी कंपनी कैरीचे पन्हे लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याचसोबत दुधापासून बनवणाऱ्या गोष्टी जसे छास,लस्सी सुद्धा कोका-कोला कंपनी घेऊन येणार आहे.
ब्लूमबर्ग यांच्या मते कोकाकोला कंपनी 2020 पर्यंत छास आणि लस्सीचे प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. गेल्या 3 वर्षामध्ये कंपनीची विक्री 32 टक्क्यांनी वाढली आहे. कोका-कोला कंपनीच्या या सेंगमेंट मध्ये बंगळुरु मधीस हेक्टर ब्रेव्हरेज, मुंब मधील एक्सोटिक फ्रुजुस आणि राजस्थानमधील जयंति ग्रुप्स सोबत टक्कर देणार आहे. परंतु सध्या जगभरात अमूल कंपनी दुध प्रोडक्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आजही कायम आहे.
त्याचसोबत कंपनी मिनिट मेड अॅपल ज्युससुद्धा लॉन्च करणार असून त्यामध्ये 25 टक्के फळाचा रस असणार आहे. काश्मिर मधील सफरचंदापासून हा ज्युस बनवला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.