Cash On Delivery Scam: जर Online Shooping करत असाल तर सावध व्हा; खोट्या कस्टमर केअरच्या OTP द्वारे ऑनलाईन फसवणुक करत आहेत चोर
Cash On Delivery Scam

जसजसे सायबर फसवणूक/ऑनलाइन फसवणूकीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे, तसतसे हे गुन्हेगारही फसवणुकीच्या पद्धती बदलत आहेत. आता फसवणुकीची आणखी एक पद्धत व्हायरल होत आहे. ही फसवणूक ऑनलाईन शॉपिंगशी संबंधित आहे. यामध्ये तुम्हाला एक कॉल येतो. तुम्हाला सांगितले जाते की तुमच्यासाठी एक पार्सल आले आहे आणि डिलिव्हरी बॉय तुमच्या घराबाहेर कुरिअर घेऊन उभा आहे. यानंतर तुम्हाला या पार्सलसाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले जाते. परंतु तुम्ही कोणतीही ऑर्डर बुक केलेली नसल्याने तुम्ही ती नाकारता.

यानंतर डिलिव्हरी बॉय तुम्हाला ही ऑर्डर रद्द करण्यास सांगतो. आता ही ऑर्डर रद्द करण्यासाठी हा डिलिव्हरी बॉय तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवतो, जो तुम्हाला त्याला सांगण्यास सांगतो. अशा वेळी अनेक लोक ऑर्डर रद्द करण्यासाठी डिलिव्हरी बॉयला ओटीपी सांगतात. यानंतर डिलिव्हरी बॉय निघून जातो आणि तुम्हाला संशयही येत नाही. पण अवघ्या काही क्षणात तुम्हाला बँकेकडून मेसेज येतो आणि तेव्हा समजते की, तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतले गेले आहेत.

(हेही वाचा:  बनावट लोन अ‍ॅप्स रिकामी करू शकतात तुमची खाती; सुरक्षित राहण्यासाठी SBI च्या या टीप्स ठेवा लक्षात)

अशाप्रकारे काही समजण्यापूर्वीच डिलिव्हरीच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. याबाबत सावध राहण्याचे आवाहन केले गेले आहे. दरम्यान, जर तुमच्या घरी अशा ऑनलाइन ऑर्डरबद्दल डिलिव्हरी बॉय आला तर, त्याला वेबसाइटबद्दल विचारा. त्यांनतर तुम्ही कोणतीही ऑर्डर दिली नसल्याचा पुरावा त्याला द्या. जर तुम्ही एखादी गोष्ट मागवली असेल आणि ती तुम्हाला नको असेल तर स्पष्टपणे नकार द्या. यासाठी तुम्हाला ऑर्डर रद्द करण्याची गरज नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आपला OTP कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सांगू नका.