Bank Holidays in March 2021: मार्च महिन्यात बँकांना 11 दिवसांची सुट्टी असणार आहे. यात चार रविवार आणि दुसर्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. डिजिटल माध्यमावर अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध असूनही आपल्याला अनेकदा चेक क्लिअरन्स, सर्व प्रकारच्या कर्ज संबंधित सेवा आणि इतर विविध कामांसाठी बँक शाखेत जावे लागते. त्यामुळे आपल्याला बँकांच्या सुट्ट्यांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. मार्च 2021 मध्ये कोणत्या तारखेला बँकांना सुट्टी असणार आहे, ते जाणून घेऊयात.
- 5 मार्च 2021: या दिवशी Chapchar Kut आहे. मिझोरममध्ये या दिवशी बँकांची सुट्टी असेल.
- 7 मार्च 2021: रविवारी या दिवशी बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- 11 मार्च 2021: या दिवस महाशिवरात्री आहे. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यात या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. (वाचा - How To Check EPF Balance: घरात बसून 'या' पद्धतीने चेक करा ईपीएफ बॅलन्स; जाणून घ्या स्टेप्स)
- 13 मार्च 2021: दुसर्या शनिवारी बँकांना सुट्टी असेल.
- 14 मार्च 2021: या दिवशी रविवार असल्याने बँकांना आठवड्याची सुट्टी असेल.
- 21 मार्च 2021: या दिवशी रविवारीमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- 22 मार्च 2021: या दिवशी बिहार दिन आहे. या दिवशी फक्त बिहार राज्यात बँकांना सुट्टी असेल.
- 27 मार्च 2021: या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
- 28 मार्च 2021: या दिवशी रविवारी असल्याने बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
- 29 मार्च 2021: या दिवस होळी आहे. या दिवशी गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड, सिक्कीम, तेलंगणा, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली, गोवा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय आणि हिमाचल प्रदेशात बँकांना सुट्टी असणार आहे.
- 30 मार्च 2021: बिहार राज्यात होळीच्या निमित्ताने बँकाना सुट्टी असेल.
वरील बँक सुट्ट्यांव्यतिरिक्त तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता. बँकेच्या वर्किंग डेजमध्ये तुम्ही आपलं काम करून घेऊ शकता.