How To Check EPF Balance: एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) चे सदस्य ईपीएफ खात्यातील ठेवींच्या तपशीलांमध्ये अनेक मार्गांनी प्रवेश करू शकतात. मिस्ड कॉल, युनिफाइड मेंबर पोर्टल, एसएमएस व ईपीएफओ वेबसाइटद्वारे ही माहिती मिळू शकते. आपल्या ईपीएफओ खात्यातील शिल्लक तपासणी तुम्ही खालील पद्धतीने करू शकता.
मिस कॉलद्वारे
मिस कॉलद्वारे पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती तुम्हाला मिळू शकते. यासाठी तुम्हाला 011-22901406 वर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिस कॉल द्यावा लागेल. मिस कॉल दिल्यावर थोड्याच वेळात तुम्हाला एसएमएस येईल. या एसएमएसद्वारे तुम्हाला पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती मिळेल. (वाचा - PF Account मध्ये तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकता नवीन बँक खात्याची माहिती; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या स्टेप्स)
एसएमएस -
- मोबाइल नंबर 7738299899 वर एसएमएस करा. आपल्या मोबाइलच्या संदेश बॉक्समध्ये EPFOHO UAN ENG टाइप करा.
- ही सेवा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहे. आपणास ही माहिती हिंदीमध्ये हवी असल्यास आपणास EPFOHO UAN HIN टाइप करावे लागेल.
- एसएमएस पाठविल्यानंतर, लवकरच एक संदेश प्राप्त होईल. या संदेशामध्ये तुम्हाला पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती मिळेल.
ईपीएफओ खाते पासबुक माहिती वेबसाइटद्वारे मिळवा -
आपण https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग इन करू शकता. आपण यूएएन आणि संकेतशब्द वापरुन लॉग इन करुन पासबुक तपासू शकता.
उमंग अॅप -
प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर वरून उमंग अॅप डाउनलोड करा. या अॅपवर बर्याच सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला 'Employee Centric Service' निवडावी लागेल. आता यूएएन क्रमांक प्रविष्ट करा. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी मिळेल. आपण 'View Passbook' अंतर्गत ईपीएफ शिल्लक तपासू शकता.