PF Account मध्ये तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकता नवीन बँक खात्याची माहिती; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या स्टेप्स

ईपीएफ सदस्याने कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांचे विद्यमान बँक खाते पीएफ खात्यासह अपडेट केले पाहिजे.

PF Account मध्ये तुम्ही ऑनलाइन अपडेट करू शकता नवीन बँक खात्याची माहिती; जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या स्टेप्स
EPFO Office (Photo Credits-Facebook)

एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) आपल्या ग्राहकांना ईपीएफ खात्यातून (EPF Account) पैसे काढण्याची परवानगी देतो. ईपीएफ सदस्याने कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांचे विद्यमान बँक खाते पीएफ खात्यासह अपडेट केले पाहिजे. ईपीएफओ सदस्य बर्‍याच वेळा पीएफ खात्याशी जोडलेले बँक खाते बंद करतात आणि नवीन खाते पीएफ खात्याशी लिंक करण्यास विसरतात.

जर बँक खात्याची माहिती योग्य नसेल, तर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. पीएफ खात्यासोबत आपले नवीन बँक खाते अपडेट करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप उपयोगात येतील. (वाचा - Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये फोटो आणि मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा, जाणून घ्या सोपा मार्ग)

  • प्रथम ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर जा आणि वापरकर्ता नाव आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • आता Manage टॅबवर क्लिक करा.
  • ड्रॉप डाऊन मेन्यूमधून 'केवायसी' निवडा.
  • आता बँक निवडा आणि बँक खाते क्रमांक, नाव आणि आयएफएससी कोड भरा आणि 'सेव्ह' टॅबवर क्लिक करा.
  • ही माहिती एकदा नियोक्ताद्वारे मंजूर झालेल्या केवायसी विभागात मंजूर होईल आणि अशा प्रकारे आपले नवीन बँक खात्याची माहिती ईपीएफ खात्यासह अपडेट केली जाईल.

आपल्या ईपीएफओ खात्यातील रक्कम 'अशी' तपासा -

  • याशिवाय सदस्य ईपीएफओ पोर्टलद्वारे त्यांचे ईपीएफ शिल्लक देखील तपासू शकतात. शिल्लक चेक करण्यासाठी खालील स्टेप्सचा अवलंब करा.
  • यासाठी सदस्याला प्रथम www.epfindia.gov.in वर जावे लागेल.
  • आता आपल्याला 'Our Services' टॅबमधून 'For Employees' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता आपल्याला 'Services' टॅबमधून 'Member Passbook' वर क्लिक करावे लागेल.

    आता आपल्याला लॉगिन करण्यासाठी आपला यूएएन आणि संकेतशब्द प्रविष्ट करावा लागेल. त्यानंतर आपण आपल्या पीएफ खात्याचे पासबुक पाहण्यास सक्षम असाल.

येथे आपले खाते आपल्या यूएएन सह टॅग होण गरजेचं आहे. तसेच, आपले यूएएन नियोक्ताद्वारे सक्रिय केले जाणे आवश्यक आहे. सदस्य या पोर्टलवरून आपले पासबुक प्रिंट करू शकतात.

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2021 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).