SBI Recruitment 2020: स्पेशलिस्ट केडर ऑफिसर व डेप्युटी मॅनेजर पदांच्या अर्जाची प्रक्रिया सुरू; sbi.co.in वर करा ऑनलाईन अर्ज
SBI (Photo Credits: Facebook)

SBI Recruitment 2020: स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer), डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager), स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officers, अभियंता फायर (Engineer Fire), स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officers, Network Specialist), स्पेशलिस्ट केडर ऑफिस सिक्युरिटी (Specialist Cadre Officers, Security Analyst) अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 22 डिसेंबरपासून सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. याशिवाय उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. (हेही वाचा - 7th Pay Commission: सरकारी सेवेत असताना कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियाला किती मिळते Death Gratuity?)

'या' तारखा लक्षात ठेवा -

  • ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ - 22 डिसेंबर 2020
  • ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख - 11 जानेवारी 2021
  • फी जमा करण्यासाठी अंतिम तारीख- 31 जानेवारी 2021

- नोंदणी प्रक्रिया तेव्हाच पूर्ण केली जाईल, जेव्हा जेव्हा अंतिम तारखेद्वारे किंवा आधीच्या ऑनलाइन मोडद्वारे फी भरली जाईल.

- उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आयडी प्रूफ, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करावेत. ज्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली नसतील, त्याचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

- उमेदवारांनी नोंद घ्यावी की, कागदपत्रांच्या पडताळणी तात्पुरती असेल. मात्र, जेव्हा उमेदवार मुलाखतीसाठी जाईल त्यावेळी त्याला सर्व मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.

- ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलेले आहे. मात्र, त्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये दोष आढळल्यास त्याला मुलाखतीसाठी येऊ दिले जाणार नाही.