रुपया (Photo Credits: PTI)

7th CPC Latest News: यंदा कोरोना व्हायरस मुळे खाजगी कर्मचा-यांसोबत बरेच सरकारी कर्मचारी बेसिक सॅलरी (Basic Salary) आणि महाभाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ कधी होईल याची आतुरतेने वाट पाहात आहे. तरीही कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता ते देखील मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणण्यास सरकार यशस्वी ठरली तर कर्मचा-यांना नक्कीच पगारवाढीचा लाभा मिळू शकतो. या दरम्यान कुणा सरकारी कर्मचा-याच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना किती ग्रॅज्युटी (Gratuity) मिळते हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

मागील काही काळात केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवरून ग्रॅज्युटी मध्ये अनेक बदल केले आहेत. त्याचदरम्यान आम्ही तुम्हाला डेथ ग्रॅज्युटीबाबत माहिती देत आहोत. ज्याचा फायदा संबंधित कर्मचा-यांच्या कुटूंबियांना होईल.हेदेखील वाचा- 7th Pay Commission: महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सह 6 अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग 1 नोव्हेंबर पासून लागू होणार

ग्रॅज्युटी म्हणजे कर्मचा-याने केलेल्या सरकारी सेवेच्या बदल्यात सरकारकडून त्याला धनराशी दिली जाते. ग्रॅज्युटी प्रत्येक कर्मचा-याला सेवानिवृत्तीनंतर अथवा सेवेत असताना आकस्मित निधनानंतर मिळते. जर एखाद्या कर्मचा-याची सरकारी नोकरी असताना वर्षभराच्या आत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबाला त्या कर्मचा-यांने एकूण काम केलेल्याच्या मोबदल्याच्या दुप्पट ग्रॅज्युटी मिळते. तर दुसरीकडे एखाद्या कर्मचा-याची एक वर्षापेक्षा अधिक आणि 5 वर्षापेक्षा कमी सरकारी सेवेच्या कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या पगाराच्या सहापट ग्रॅज्युटी कुटूंबाला मिळते. तसेच 20 वर्षापेक्षा कमी सेवेचा कालावधी असल्यास 12 टक्के आणि 20 पेक्षा जास्त वर्ष काम करत असल्यास 33% ग्रॅज्युटी मिळते.

ग्रॅज्युटी कायद्यांतर्गत 1972 मध्ये येत नसलेल्या कर्मचा-यांसाठी ग्रॅज्युटी 10 लाखांवरून 20 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.