Akasa Air, IndiGo आणि Air India ने एका वर्षात दिली 1,120 नव्या विमानांची ऑर्डर
Flight | (PC- Pixabay.com)

देशांतर्गत विमान कंपनी अकासा एअर (Akasa Air) ने गुरुवारी सांगितले की, त्यांनी 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. एअरलाइनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजाचा विस्तार करायचा असल्याने ही ऑर्डर देण्यात आली आहे. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की नवीन ऑर्डरमध्ये 737 मॅक्स 10 आणि 737 मॅक्स 8-200 जेटचा समावेश आहे. एअरलाइनला 2032 पर्यंत हे विमाने मिळतील.

जून 2023 मध्ये चार विमानांची ऑर्डर

वृत्तानुसार, नवीन विमानाच्या आगमनामुळे कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विस्तार योजनांना बळकटी मिळेल. Akasa Air ने 2021 मध्ये 72 Boeing 737 Max विमानांची प्रारंभिक ऑर्डर दिली होती. यानंतर, कंपनीने जून 2023 मध्ये चार बोईंग 737 मॅक्स-8 विमानांची ऑर्डर दिली. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, जानेवारी 2024 च्या या ताज्या करारामुळे, एअरलाइनची एकूण ऑर्डर बुक 226 विमाने झाली आहे. (हेही वाचा -Air India New Uniforms: एअर इंडियाकडून केबिन, कॉकपिट क्रूसाठी नवीन गणवेश सादर; Manish Malhotra ने केला डिझाइन (Watch Video))

आठ वर्षात एकूण 204 विमाने मिळणार -

अकासा एअर सध्या 22 विमानांचा ताफा चालवते. कंपनी पुढील आठ वर्षांत एकूण 204 विमाने घेणार आहे. Akasa Air चे संस्थापक आणि CEO विनय दुबे यांनी सांगितले की, या मोठ्या आणि ऐतिहासिक विमान ऑर्डरमुळे या दशकाच्या अखेरीस जगातील टॉप-30 आघाडीच्या एअरलाइन्समध्ये स्थान मिळवण्यास मदत होईल. आमच्या ताफ्यात ही वाढ आम्हाला आमच्या ऑपरेशन्सची ताकद वाढवण्यास मदत करेल. भविष्यात आम्ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करू. (हेही वाचा - Air India New Logo: एअर इंडियाचा लोगो आणि डिझाइन बदलले; सोशल मीडियावर लोकांनी दिल्या संमिश्र प्रतिक्रिया)

दरम्यान, विमान कंपनी जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या विमान बाजारपेठेतील म्हणजेच भारतातील प्रवासातील भरभराटीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. आकासा ही भारतातील सर्वात नवीन विमान कंपनी आहे. 2022 मध्ये लॉन्च झाल्यापासून या कंपनीने 4% मार्केट शेअर मिळवला आहे.