Photo Credit: PTI

बऱ्याचदा अनेक कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सदस्यांना त्यांचे आधार कार्ड नंबर, युनिव्हर्सल खाते क्रमांकाशी (यूएएन) जोडण्यात अडचणी येतात ज्यात नाव, जन्मतारीख किंवा लिंग जुळत नसल्यास वैयक्तिक तपशील न जुमानता, पैसे काढणे. भविष्य निर्वाह निधी शक्य होत नाही. वापरकर्त्याला एक संदेश मिळतो ज्यात "Error while AADHAAR authentication. "Pi" (basic) attributes of demographic data did not match. ऐसे लिहिलेले असते. म्हणजेच  "आधार प्रमाणीकरण करताना डेमोग्राफिक डेटाचे विशेषता जुळत नाही. (Aadhaar Card for Newborn: तुमच्या नवजात बालकाचं आधार कार्ड अवघ्या 2 कागदपत्रांच्या मदतीने uidai.gov.in वर अप्लाय कसं कराल? )

सर्व पीएफ खातेधारकांनी आधारसह युएएन सत्यापित करणे आवश्यक आहे. सर्व प्रथम, ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, आपल्या खात्यास आधार कार्डाशी लिंक करा आणि यूएएन देखील सत्यापित करा. जेणेकरून जेव्हा कधी तुम्ही तय निगडित व्यवहार कराल तेव्हा आपल्याला त्रास होणार नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया सरकारने सुलभ केली आणि त्यामुळे यूपीएफच्या ग्राहकांना ईपीएफ खात्यातून अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करणे, नामनिर्देशन इत्यादी ऑनलाईन सेवा मिळविण्यास ईपीएफ ग्राहकांना मदत होत आहे. सरकारच्या उमंग मोबाइल अ‍ॅप द्वारे ही तुम्ही आधार आणि UAN लिंक करु शकता.

खाली दिल्या प्रमाणे तुम्ही आधार आणि UAN लिंक करू शकता.

प्रथम आपण EPFO पोर्टल epfindia.gov.in वर जा

त्यानंतर epfindia.gov.in वर लॉगइन करा

त्यानंतर "Manage > Modify Basic Details" क्लिक करा

तुमच्या आधार कार्ड वरील योग्य माहिती भरा

'Update Details' वर क्लिक करा यानंतर, तुमची विनंती सबमिट होईल

एखादा कर्मचारी ही विनंती डिलीट ही करू शकते, जर त्याने / तिने केली भरण्यात काही चूक ले;केली असेल तर, मंजुरीपूर्वीच ते हटविले जाऊ शकते

नियोक्ता इंटरफेस पोर्टलमध्ये लॉग इन करून ही विनंती कॅन्सल करू शकतो त्यासाठी Member>Details Change Request  वर क्लिक करावे

अप्रूव झाल्यानंत, विनंती ईपीएफओ कार्यालयातील युनिफाइड पोर्टलच्या फील्ड ऑफिस इंटरफेसमध्ये डिलिंग हँडमध्ये लॉगइन करण्याचे कार्य म्हणून दिसून येईल.