
इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल करण्यासाठी आता आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. या संदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यंतरी दोन याचिकाकर्त्यांना आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक नसतानाही प्राप्तिकर भरण्याची मुभा दिली होती. मात्र दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिल्याने केंद्र सरकारने पुन्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता IT Return भरण्यासाठी आधार-पॅन लिंक असणे अनिवार्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तुम्ही जर आधार-पॅन कार्ड लिंक केले नसेल तर लवकरात लवकर करु घेणे आवश्यक आहे.
पॅन कार्डला आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2019 देण्यात आली आहे. त्यानंतर पॅन कार्ड इनव्हॅलिट होईल. पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक नसल्यास तुम्हाला ऑनलाईन ITR करता येणार नाही. तसेच टॅक्स रिफंड मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतील. (पॅन कार्ड आधार कार्डसोबत कसे कराल लिंक?)
मीडिया रिपो्ट्सनुसार, सप्टेंबर महिन्यांपर्यंत 122 कोटी लोकांजवळ आधार कार्ड आहे. तर 41 कोटींहून अधिक लोकांकडे पॅन कार्ड आहे. त्यापैकी 21 कोटींहून अधिक लोकांना पॅन-आधार कार्ड लिंक केलेले आहे.