Aadhaar-Pan | (Photo Credits: Archived, edited)

पॅन कार्ड-आधार कार्ड जोडणीची (Aadhaar-Pan Card Link)आता अंतिम मुदत अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 30 मार्च असलेली ही अंतिम मुदत वाढवून 30 जून करण्यात आली आहे. अजूनही आधार-पॅन कार्ड जोडणी केली नसल्यास तुम्हांला काही दिवसांची संधी आहे. 30 मार्चची अंतिम मुदत आता वाढवून 30 जून करण्यात आली आहे. 30 जून पर्यंत कार्डची जोडणी न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल त्याचा फटका अनेक ठिकाणी बसू शकतो. Sub-section (2) of section 139AA अंतर्गत आधार- पॅन कार्ड सोबत जोडणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकार कडून या आधार-पॅन कार्ड जोडणीसाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली असल्याने आता ही प्रक्रिया सशुल्क करण्यात आली आहे.

कसं जोडाल आधारला पॅन कार्ड?

आधार-पॅन लिकिंग साठी करदात्यांना आधी Income tax e-Filing portalवर रजिस्टर करावं लागणार आहे. त्यानंतर लॉग इन आयडी, पासवर्ड आणि जन्म तारखेच्या मदतीने लॉग इन करता येणार आहे.

“Link Aadhaar” चा पर्याय आता तुम्हांला प्रोफाईल सेटिंग मध्ये पाहता येणार आहे.

नाव, जन्मतारीख, लिंग आदी तपशीलांसह सारी माहिती एकदा समाविष्ट करून तपासून घ्या. तपशील योग्य असल्यास तुमचा आधार नंबर टाकून 'लिंक नाऊ' बटण वर क्लिक करा.

आता तुम्हांला आधार पॅन सोबत लिंक झाल्याचा मॅसेज दिसेल.

Income Tax Department ने गेल्या वर्षी सांगितले होते की 31 मार्चपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, परंतु असा पॅन कार्ड नंबर आणखी एक वर्ष म्हणजे मार्च 2023 पर्यंत, ITR भरणे, रिफंडचा दावा करणे आणि इतर कामांसाठी सुरू ठेवला जाईल. incometax.gov.in/iec/foportal/ वर तुमचं आधार-पॅन कार्ड लिंक झाले आहे की नाही याची माहिती दिली जाणार आहे. UIDPAN <12 अंकी आधार नंबर> <10 अंकी पॅन नंबर>

हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवला तरीही तुम्हांला माहिती मिळू शकेल. Fake Companies: नागरिकांच्या पॅन व आधार कार्डाद्वारे तब्बल 119 खोट्या कंपन्या केल्या तयार; आरोपीस जयपूर येथून अटक .

80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती, आयकर कायद्यात दिलेल्या व्याख्येनुसार अनिवासी आणि भारतीय नागरिक नसलेल्यांना यामधून मुभा देण्यात आली आहे.