Aadhaar Card Fraud: पब्लिक कंप्यूटर वरून आधार कार्ड डाऊनलोड करत असाल तर सावधान!  UIDAI ने दिलाय इशारा
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card) हे महत्त्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. अनेक सरकारी, गैर सरकारी कामांसाठी, सवलतींचा, योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असते. 12 अंकी आधारकार्डासोबत प्रत्येक भारतीयाची माहिती जोडलेली आहे. बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती त्यामध्ये आहे. अनेकदा घाईत असताना तुमच्याकडे आधारकार्ड उपलब्ध नसल्यास ऑनलाईन आधारकार्ड तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून डाऊनलोड देखील करू शकता. पण या सुविधेचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत.

सध्या सायबर फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. सार्वजनिक इंटरनेट सुविधा पुरवल्या जाणार्‍या ठिकाणा वरून, सायबर कॅफे मधून अशाप्रकारे आधार कार्ड डाऊनलोड करणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. UIDAI ने अशाप्रकारे कार्ड डाऊनलोड केल्यास त्याच्या सार्‍या कॉपीज संगणकातून डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे. हे देखील नक्की वाचा: UIDAI ने केलं अलर्ट, फ्रॉड पासून दूर राहण्यासाठी Aadhar Card असं ठेवा सुरक्षित .

रिसायकल बिन मध्येही आधार कार्ड च्या कॉपीज ठेवू नका. आधार कार्डाचा वापर करून तुमच्या वैयक्तिक माहितीवर डल्ला मारला जाऊ शकतो. सरकारी नियमांनुसार आता आधार कार्ड बॅंक अकाऊंट सोबतही लिंक केलेला असतो त्यामुळे आर्थिक संकटाचा, आर्थिक फसवणूकीचा देखील धोका बळावला आहे.