7th Pay Commission: केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय रेल्वेतील नॉन गॅजिटेड कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार भारतीय रेल्वेतील नॉन गॅजिटेड कर्मचाऱ्यांना 78 दिवसांसाठी उत्पादकता आधारित बोनस मिळणार आहे. हा बोनस या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात मिळणार आहे. बोनसची रक्कम सुमारे 17,951 रुपये इतकी असणार आहे. या बोनसचा लाभ रेल्वेतील सुमारे 12 लाख नॉन गॅजिटेड कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी रेल्वेच्या विभागातील महाव्यवस्थापकांना (General Manager) दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोणत्याही स्थितीत ही रक्कम दुर्गा पूजा आणि दसरा सणापूर्वी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ही रक्कम देण्यात यावी. म्हणजे कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन आणि बोनसची रक्कम मिळून त्याचा मासिक पगार जमा करण्यात यावा.
दरम्यान, ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन संघटनेचे व्यवस्थापक शिव गोपाल मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी 22000 प्रवासी रेल्वे अत्यंत कठोर मेहनत घेऊन चालवली आहे. या रेल्वेने 2.5 कोटी प्रवाशांनी प्रवास केला जो आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. त्याच तुलनेत मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांमधूनी रेल्वेला अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक बोनस मिळायला हवा. याबाबात रेल्वे बोर्डाच्या चेअरमनला पत्र लिहून बोनसची रक्कम वाढविण्यात यावी तसेच हा कालावधी 78 दिवसांवरुन वाढवून तो 80 दिवस करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पुढे बोलताना मिश्रा यांनी सांगितले की, रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसच्या सूत्रामध्ये तत्काळ बदल करण्याची गरज आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी 78 दिवसांनंतर बोनसच्या धर्तीवर 17950 रुपये मिळत आहेत. ही रक्कम सर्वसाधारण मजूरीपेक्षाही कमी आहे. आजघडीला एक महिन्याची कमीत कमी मजूरी ही 18000 रुपये इतकी असते. तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रति दिन वेतनावर आधारीत बोनस मिळतो. यात जितक्या दिवसाचा बोनस घोषित होतो त्या दिवसाचा बोनस मिळतो. रेल्वेकडून 75 दिवसांचा बोनस देण्याची योजना होती. जिला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर 78 दिवस करण्यात आले. परंतू, कर्मचाऱ्यांची मागणी आहे की, किमान 80 दिवसांचा बोनस कर्मचाऱ्यांना मिळावा. (हेही वाचा, 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना दणका, महत्त्वाचा भत्ता बंद, मासिक वेतनात घट होण्याची शक्यता)
रेल्वेकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा विचार सुरु होता. 30 दिवसांच्या तत्वावर 7000 रुपये बोनस अशा सूत्रावर ही मांडण करण्यात आली आहे. याचा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून गेले प्रदीर्घ काळ विरोध केला जात आहे. रेल्वे कर्मचारी संघटनांच्या हवाल्याने प्रसारमांध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार रेल्वे कर्मचारी या वेळी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही रेल्वेने चांगले काम केले आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अधिक बोनस मिळायला हवा.