
द ट्रायबल को ऑपरेटिव्ह मार्केटींग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया (TRIFED)कडून 54 विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ज्युनियर असिस्टंट, ज्युनियर अकाऊंटंट अशा पदांचा यामध्ये समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचा 30 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. यामध्ये ज्युनियर असिस्टंट पदासाठी 21, ज्युनियर कमर्शिअल असिस्टंट पदांसाठी 14 तर ज्युनियर अकाऊंट पदासाठी 10 जागांवर भरती होणार आहे.
इच्छुक उमेदवार trifed.in या संकेतस्थळावरून थेट अर्ज दाखल करू शकतात. तर वयोमर्यादा, अॅप्लिकेशन फी, पात्रता निकष यासाठी अधिक माहिती तुम्हांला ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. दरम्यान पात्र उमेदवाराला लेव्हल 2 साठी 19900 ते 63200 इतका पगार असेल. यामध्ये सुरूवातीला बेसिक पे 19900 रूपये इतका असेल. यासोबत इतर भत्तांचा सअमावेश असेल. ज्यामध्ये महागाई भत्ता, घरभाडं, वाहतूक भत्ता यांचा समावेश असेल. हे सारे भत्ते उमेदवाराला 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहेत.
ज्युनियर असिस्टंट, ज्युनियर कमर्शिअल असिस्टंट, ज्युनियर अकाऊंटंट या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. तसेच त्याला कम्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. सोबत 2 वर्षांचा कामाचा अनुभव, अर्जदार किमान 21 वर्षांचा असणं आवश्यक आहे. तसेच कमाल वयोमर्यादा 30 वर्ष असावी.