7th Pay Commission: होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांवर पडणार पैशाचा पाऊस! मोदी सरकार DA वाढवण्याच्या तयारीत
PM Modi and Money | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

7th Pay Commission: होळीचा सण येण्यास काही दिवस उरले आहेत. या निमित्ताने मोदी सरकार देशातील सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट (7th Pay Commission DA Hike) देण्याची तयारी करत आहे. वास्तविक, सरकार महागाई भत्ता (DA) आणि महागाई रिलीफ (DR) मध्ये वाढ करण्याची योजना बनवत आहे. होळीपूर्वी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही भेट देईल, अशी अपेक्षा आहे.

सरकारने अद्याप अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी, अधिकृत अपडेट लवकरचं येईल अशी अपेक्षा आहे. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर झाल्यानंतर डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता बळकट झाली आहे. (वाचा - RBI ने जारी केले नवे नियम! तुमच्या पैशावर होणार थेट परिणाम; कधीपासून लागू होणार नवीन नियम? जाणून घ्या)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार 16 मार्च रोजी DA आणि महागाई रिलीफ (DR) वाढवण्याची घोषणा करू शकते. वास्तविक, 16 मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवता येईल. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, DA मूळ वेतनावर मोजला जातो. सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. सध्या महागाई भत्ता 31 टक्के आहे. लवकरच ते 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या या पावलामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

पगाराचे Calculation -

जर एखाद्याचा मूळ पगार 18000 रुपये असेल तर त्याला 31 टक्के डीएनुसार 5,580 रुपये दरमहा महागाई भत्ता मिळतो. महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला तर 34 टक्के होईल. अशा प्रकारे, डीए 34 टक्के दराने 6,120 रुपये प्रति महिना वाढेल. मासिक वाढीच्या संदर्भात पाहिल्यास ते 540 रुपये (6120-5580) च्या आसपास असेल.

महागाई भत्ता म्हणजे काय?

वाढत्या महागाईबरोबरच लोकांचे उत्पन्न वाढवणेही गरजेचे आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डीए देते. त्याचा उद्देश महागाईचा प्रभाव कमी करणे हा आहे. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या आधारे मोजला जातो. शहरांनुसार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तफावत आहे.