Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात कोविड-19 (COVID-19) रुग्णांच्या संख्येत मागील 24 तासांत लाक्षणिक वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. देशात काल (23 जून) दिवसभरात 15,968 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 465 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिली आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 लाख 56 हजार 183 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 14,476 वर पोहोचला आहे. ही आकडेवारी फार धक्कादायक असून कोरोना व्हायरसचे भारतातील जाळे अधिकाधिक पसरत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारत (India) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 10,495 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य घडीला देशात 1,83,022 कोरोना पॉझिटीव्ह  रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात आतापर्यंत 2,58,685 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात असून त्या पाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरात मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. Coronavirus, Lockdown and Education: भारतातील 27.5 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बाधला कोरोना व्हायरस, लॉकडाऊन धोरणाचा मोठा फटका

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून हा आकडा आता 1 लाखांच्या वर पोहोचला आहे. राज्यात काल दिवसभरात (23 जून) 3214 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 39 हजार 010 वर पोहोचली आहे.