ONGC Recruitment 2020: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 4 हजार 182 पदांची भरती; असा करा अर्ज
ONGC Recruitment 2020 (PC - Twitter)

ONGC Recruitment 2020: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लॉकडाऊमुळे अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. मात्र, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये 4 हजार 182 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

ओएनजीसीमधील विविध भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व पदासांठी 17 ऑगस्ट 2020 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ongcapprentices.ongc.co.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

दरम्यान, ONGC मधील पदांसाठी अर्ज करण्यासाठी 29 जुलै 2020 पासून सुरूवात होणार आहे. तसेच 17 ऑगस्ट 2020 ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असणार आहे. (हेही वाचा - SBI CBO Recruitment 2020: पदवीधर तरूणांसाठी एसबीआय मध्ये 3850 जागांसाठी नोकरभरती; sbi.co.in वर 16 ऑगस्टपूर्वी करा अर्ज)

राज्याअंतर्गत ONGC पदाची माहिती -

उत्तर प्रदेश - 228 पदे

मुंबई सेक्टर - 764 पदे

वेस्टर्न सेक्टर - 1579 पदे

पूर्व विभाग - 716 पदे

दक्षिणी क्षेत्र - 674 पदे

मध्यवर्ती क्षेत्र - 221 पदे

वरील सर्व पदांसाठी लेखापाल (मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर) किंवा सहाय्यक मानव संसाधन (मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर) अशी पात्रता असणं आवश्यक आहे. याशिवाय या सर्व पदांसाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 24 वर्षे सवलत आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 ऑगस्ट पर्यंत ONGC च्या अधिकृत वेबसाइट ongcapprentices.ongc.co.in वरून अर्ज करू शकतात.