Indigo Flight Cancel: इंडिगो एअरलाइन्सची 20% उड्डाण सेवा रद्द, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

इंडिगो एअरलाइन्सने (Indigo Airlines) मोठा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाच्या नवीन प्रकाराचा वाढता प्रादुर्भाव मुळे इंडिगोने आपल्या विमान सेवा रद्द केल्या आहेत. इंडिगोने म्हटले आहे की कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता 20% फ्लाइट (Indigo Flight Cancel) रद्द करण्यात येत आहेत. जेव्हा एखादा प्रवासी एका फ्लाइटच्या बदल्यात वेगळ्या तारखेसाठी फ्लाइट घेतो, तेव्हा त्याला काही बदल शुल्क भरावे लागते. पण इंडिगो एअरलाइन्सने हे शुल्क 31 जानेवारीपर्यंत माफ केले आहे. फ्लाइट रद्द झाल्यानंतर, ते इतर कोणत्याही फ्लाइटचे तिकीट बुक करतील की नाही हे प्रवाशांवर अवलंबून आहे. स्पाइसजेट एअरलाइन्सनेही अशीच काही सुविधा सुरू केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पाइसने नवा नियम जाहीर केला आहे. त्यांनी 31 जानेवारीपर्यंतचे बदल शुल्कही माफ केले आहे.

पीटीआय'ने एका प्रसिद्धीपत्रकाचा अहवाला देत म्हटले आहे की, कोरोनाचे वाढते संक्रमण आणि प्रकरणे पाहता, इंडिगोचे मोठ्या संख्येने ग्राहक व त्यांच्या प्रवासाच्या योजना बदलत आहेत. इंडिगोने म्हटले आहे की, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, इंडिगो एअरलाइन्स बदल शुल्क माफ करत आहे आणि सर्व नवीन आणि विद्यमान ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंत मोफत बदलाची ऑफर देत आहे. 31 मार्चपर्यंतच्या तिकिटाची तारीख बदल शुल्क न भरता 31 तारखेपर्यंत बदलता येईल. या स्वस्त विमान प्रवास कंपनीने म्हटले आहे की, कोरोनामुळे प्रवाशांची मागणी कमी झाली आहे, त्यामुळे काही विमान सेवा रद्द करण्यात येत आहेत. (हे ही वाचा Shocking! दोन मुलांनी आईची लावून दिली 6 लग्ने; समोर आले धक्कादायक कारण)

इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे की, सध्याच्या वेळापत्रकातील 20 टक्के विमानसेवा काढून टाकण्यात येत आहे. म्हणजेच, सध्या कार्यरत असलेल्या सुमारे 20 टक्के उड्डाण सेवा रद्द केल्या जात आहेत. जेथे शक्य असेल तेथे, फ्लाइट रद्द केली जाईल आणि प्रवास सुरू होण्याच्या किमान 72 तास आधी ग्राहकांना पुढील फ्लाइटमध्ये हलवले जाईल. प्लॅन बी अंतर्गत त्यांचा प्रवास देखील बदलता येतो. प्लॅन बी ची माहिती इंडिगोच्या वेबसाइटवर दिली जाईल. फ्लाइट रद्द झाल्यास किंवा प्रवास बदलल्यास, कॉल सेंटरवर मोठ्या संख्येने कॉल येत आहेत, त्यामुळे लाइन व्यस्त आहे. हे टाळण्यासाठी इंडिगोने प्रवाशांना डिजिटल माध्यमातून माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे.