Israel-Hamas War: हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान गाझा पट्टीतील संघर्षग्रस्त पॅलेस्टिनींना भारताने रविवारी मानवतावादी मदत पाठवली. पॅलेस्टाईनला जवळपास 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य पाठवण्यात आले आहे. हे विमान इजिप्तमार्गे गाझामध्ये पोहोचेल. ट्विटरवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन एक IAF C-17 विमान इजिप्तमधील अल-अरिश विमानतळाकडे रवाना झाले आहे.
इजिप्त आणि गाझा दरम्यानच्या रफाह बॉर्डर क्रॉसिंगद्वारे या वस्तू पॅलेस्टाईनला पाठवल्या जातील. बागची यांनी माहिती दिली की मानवतावादी मदतीमध्ये जीवन रक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ताडपत्री, पाणी शुद्धीकरण गोळ्या आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. (हेही वाचा - Gaza Internet Shutdown: गाझा पट्टीच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद, इस्रायल-हमास युद्धाचे पडसाद)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बोलल्यानंतर तीन दिवसांनी पॅलेस्टाईनला मदत पाठवण्यात आली आहे. गुरुवारी त्यांच्या संभाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत पॅलेस्टिनींना मानवतावादी मदत पाठवत राहील. गाझा पट्टीतील एका इस्पितळात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे झालेल्या नागरिकांच्या जीवितहानीबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला. याशिवाय त्यांनी इस्त्राईलमधील दहशतवाद, हिंसाचार यामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
दरम्यान, पॅलेस्टिनी दहशतवादी गटाच्या आश्चर्यकारक आणि अभूतपूर्व हल्ल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील रक्तरंजित युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंनी 5,000 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मध्य-पूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. या युद्धाचा जगभरातून आणि जागतिक नेत्यांकडून तीव्र निषेध करण्यात आला.
#WATCH | Hindon Air Base, Ghaziabad (Uttar Pradesh) | An IAF C-17 flight carrying nearly 6.5 tonnes of medical aid and 32 tonnes of disaster relief material for the people of Palestine departs for El-Arish airport in Egypt.
The material includes essential life-saving medicines,… pic.twitter.com/aAlNbhEJ9L
— ANI (@ANI) October 22, 2023
गाझा हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. इस्रायलच्या रॉकेट हल्ल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा हमासने केला असला तरी इस्रायलने या दाव्याचे खंडन केले आहे.