भारतीय रेल्वेची 30 वर्षे जुनी शताब्दी एक्स्प्रेसचे स्थान घेणारी, ‘ट्रेन 18’ आज परीक्षणासाठी रुळावर उतरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेनचे ट्रायल तीन ते चार दिवस चालणार आहे. ही देशातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन आहे. सेल्फ प्रपल्शन मॉड्यूलवर चलनी हे ट्रेन, 160 किमी प्रती किमी वेगाने धावू शकेल. एखाद्या ठिकाणी पोहचण्यासाठी 16 कोच असलेली ही ट्रेन शताब्दी पेक्षाही कमी वेळ घेणार आहे.
ट्रेनविषयी काही महत्वाच्या गोष्टी
> ही ट्रेन बनवण्यसाठी 18 महिन्यांचा कालावधी लागला आहे. साधारण 100 करोड रुपये खर्चून ही ट्रेन बनवण्यात आली आहे.
> 29 ऑक्टोबरला या ट्रेनचे अनावरण होईल. त्यानंतर ही ट्रेन परीक्षणासाठी रिसर्च डिझाइन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) ला सोपवण्यात येईल.
> ट्रेनमध्ये 'एक्झिक्युटीव्ह' आणि 'नॉन एक्झिक्युटीव्ह' असे दोन कोच आहेत. एक्झिक्युटीव्ह चेअर क्लासमध्ये 56 यात्री बसण्याची क्षमता आहे. तर नॉन एक्झिक्युटीव्हमध्ये 78 जणांसाठी बसण्याची आसनव्यवस्था आहे.
> ट्रेनच्या सीट्स या 360 अंशामध्ये फिरणाऱ्या आहेत, त्यामुळे तुम्हाला हव्या त्या दिशेला बसून तुम्ही प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.
> शताब्दी ही 130 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावते, तर ही ट्रेन 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे.
> ट्रेनमध्ये मॉड्युलर टॉयलेटची सोय आहे. दिव्यांगांसाठी ट्रेनमध्ये खास सुविधा आहे. व्हिलचेअरही उपलब्ध आहे.
> ट्रेन 18मध्ये जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत