Rajasthan Education Minister Madan Dilawar (Photo Credit: X/@madandilawar)

Shivkar Bapuji Talpade: राइट ब्रदर्स (Wright Brothers) च्या खूप आधी विमानाचा शोध लावणारा भारत हा पहिला देश होता. भारतीय संशोधक शिवकर बापूजी तळपदे (Shivkar Bapuji Talpade) यांनी राइट ब्रदर्सच्या आधी पहिले विमान उडवले, असा दावा राजस्थानचे शालेय शिक्षण मंत्री मदन दिलावर (Madan Dilawar) यांनी बुधवारी केला. ते राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना मदन दिलावर म्हणाले की, शिवकर बापूजी तळपदे नावाच्या भारतीयाने 1895 मध्ये मुंबईत मानवरहित विमान उडवले होते, परंतु भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असल्याने इतिहासाच्या पुस्तकात याची नोंद नाही.

याशिवाय दिलावार यांनी भारताच्या वैमानिकशास्त्रातील प्राचीन पराक्रमाचा पुरावा देताना हिंदु महाकाव्यांमध्ये नमूद असलेल्या पौराणिक रथ पुष्पक विमानाचाही यावेळी उल्लेख केला. एरोनॉटिक्सच्या क्षेत्रात आपला देश नेहमीच प्रगत राहिला आहे. जेव्हा आपण विमान बनवण्याबद्दल बोलतो तेव्हा राईट ब्रदर्सचे नाव दिसते. परंतु ते खरे नाही. सत्य हे आहे की, तळपदे नावाच्या भारतीयाने राइट ब्रदर्सच्या आधी विमानाचा शोध लावला होता, असं दिलावर यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - DGCA Fines Air India: व्हीलचेअर न मिळाल्याने प्रवाशाचा मृत्यू; डीजीसीएने एअर इंडियाला ठोठावला 30 लाखांचा दंड)

भारताने ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस), लॅसिक नेत्र शस्त्रक्रिया, दशांश बिंदू आणि पाईचे मूल्य यासारखे इतर अनेक वैज्ञानिक शोध लावले आहेत, असेही यावेळी दिलावर यांनी नमूद केलं राज्य सरकार वर्तमान इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि भारताच्या गौरवशाली भूतकाळाबद्दल सत्य माहिती समाविष्ट करण्यासाठी एक समिती स्थापन करेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा -खुशखबर! Air India मधून विमान प्रवास करणा-या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणार 50% सूट, 'ह्या' असतील महत्त्वाच्या अटी)

तथापी, मंत्र्यांसमवेत आलेले विधानसभा अध्यक्ष वासुदेव देवनानी यांनी यावेळी सांगितले की, देशाच्या महान शास्त्रज्ञांचे चरित्र आणि त्यांच्या कर्तृत्वाने नवीन पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे. तसेच मुलांमध्ये स्वदेशी आणि स्वावलंबनाची भावना रुजवण्याची गरजही यावेळी देवनानी यांनी व्यक्त केली.