Air India (PC - Twitter)

DGCA Fines Air India: मुंबई विमानतळावर व्हीलचेअर (Wheelchair) न दिल्याने 80 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) गुरुवारी एअर इंडिया (Air India)ला 30 लाखांचा दंड ठोठावला आहे. 12 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेत एका प्रवाशाने मुंबईत आल्यावर व्हीलचेअरची विनंती केली होती. एअर इंडियाने वृद्ध प्रवाशाला व्हीलचेअरसाठी थांबण्यास सांगितले होते. परंतु, तरी पीडित प्रवाशाने चालत निघाला. काही अंतर चालल्यानंतर तो खाली कोसळला आणि त्याचे निधन झाले.

तपासणीनंतर, DGCA ला आढळले की, एअर इंडिया कॅरेज बाय एअर - पर्सन विथ डिसॅबिलिटी (दिव्यांगजन) आणि/किंवा कमी गतिशीलता असलेल्या व्यक्ती नियमांचे उल्लंघन करत आहे. विमान प्रवासादरम्यान, आवश्यक असलेल्या प्रवाशांना व्हीलचेअर सहाय्य प्रदान करणे अनिवार्य आहे. (हेही वाचा -खुशखबर! Air India मधून विमान प्रवास करणा-या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणार 50% सूट, 'ह्या' असतील महत्त्वाच्या अटी)

तथापी, एअर इंडियाने त्यांच्या प्रतिक्रियेत दावा केला की, प्रवाशाने दुसऱ्या व्हीलचेअरची वाट पाहण्याऐवजी त्याच्या पत्नीसोबत चालणे पसंत केले. तथापि, DGCA ने नमूद केले की, प्रवाशाच्या सुरुवातीच्या निर्णयाची पर्वा न करता व्हीलचेअर प्रदान करण्याचे दायित्व पूर्ण करण्यात एअरलाइन अयशस्वी ठरली. (Mobile Blast in Air India Flight: टेकऑफ दरम्यान झाला मोबाईलचा स्फोट; एअर इंडियाच्या विमानाचे करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)

याप्रकरणी DGCA ने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच प्रवासादरम्यान मदतीची आवश्यकता असलेल्या प्रवाशांसाठी व्हीलचेअरची पुरेशी उपलब्धता राखण्याच्या गरजेवर भर देऊन सर्व विमान कंपन्यांना एक सल्लागार जारी केला असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.