गुजरातच्या (Gujrat) सुरत (Surat) येथे एका वैद्यकीय शिबिराला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी सांगितले की, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणे ही सामान्य उपलब्धी नाही. ते पुढे म्हणाले की, या यशामुळे आम्हाला या अमृत कालमध्ये आणखी कठोर परिश्रम करण्याचा आणि मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचा आत्मविश्वास मिळाला. ही प्रगती सामान्य नाही. याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. हा उत्साह आपण कायम ठेवला पाहिजे. ब्लूमबर्गच्या ताज्या गणनेनुसार, भारत युनायटेड किंगडमला मागे टाकत मार्च 2022 च्या अखेरीस जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला.
सुरतच्या ओलपाड येथे आयोजित वैद्यकीय शिबिरात विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आणि उपस्थितांना पंतप्रधान मोदी संबोधित करत होते.केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, गेल्या आठ वर्षात सरकारने गरिबांसाठी देशभरात तीन कोटी घरे बांधली आहेत. त्यापैकी सुमारे 10 लाख घरे एकट्या गुजरातमध्ये बांधण्यात आली. हेही वाचा Guidelines for Social Media Influencers: सरकार घेऊन येत आहे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे; घोषित करावी उत्पादनाच्या प्रमोशनची रक्कम
इतर केंद्रीय योजनांवर बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आज गुजरातमधील 97 टक्के ग्रामीण कुटुंबांना नळाचे पाणी मिळत आहे. पीएम-किसान सन्मान निधी अंतर्गत, देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2 लाख कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत.