COVID19 Vaccination In India: कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारत अमेरिकेच्या पुढे; देशात आतापर्यंत 32.36 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दिली लस
Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कोरोना महामारीमुळे (Coronavirus) संपूर्ण जगाला गंभीर परिणाम भोगावे लागले आहे. भारतासह (India) संपूर्ण जग गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाशी युद्ध करत आहेत. दरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हे एकमात्र उपाय असल्याचे सर्वजण जाणून आहेत. यामुळे अनेक देश लसीकरणावर भर देताना दिसत आहे. यातच कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात (COVID19 Vaccination) एकूण लसी देण्यासंदर्भात अमेरिकेला (America) मागे टाकत भारताने नवा मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात कोरोना लसीकरण अभियानाची सुरुवात 16 जानेवारी 2021 रोजी तर, अमेरिकेत लसीकरण अभियानाला 14 डिसेंबर 2020 रोजी सुरुवात झाली होती. मात्र, तरीही भारतात आतापर्यंत 32.36 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आल्या आहेत.

भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43 लाख 21 हजार 898 सत्रांमध्ये, एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 नगरिकांचे लसीकरण झाले आहे. देशात गेल्या 24 तासात 17 लाख 21 हजार 268 जणांनी लस घेतली आहे. कोरोना लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. हे देखील वाचा- Twitter ने पुन्हा केले भारताच्या नकाशामध्ये बदल; जम्मू-काश्मीर आणि लडाखला दाखवले वेगळे देश

ट्वीट-

भारतात गेल्या 24 तासात 46 हजार 148 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आज 5 लाख 72 हजार 994 रुग्ण सक्रीय आहेत. महत्वाचे म्हणजे, देशातील सक्रीय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णसंख्येत एकूण 13,409 इतकी घट झाली आहे. तर, केवळ 1.89 टक्के सक्रीय रुग्ण आहेत.