COVID-19 Infections: भारतात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. दररोज लाखो नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अशातचं कोविड संक्रमणामध्ये लोकांना घरातचं राहण्याचे आवाहन करीत निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल (Niti Aayog Member Dr VK Paul) यांनी सोमवारी सांगितले की, आजूबाजूला कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असेल तर, घरातदेखील मास्क घालण्याची वेळ आली आहे.
इतर वरिष्ठ कार्यकर्त्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना डॉ पॉल म्हणाले की, कृपया आवश्यकता नसल्यास बाहेर जाऊ नका आणि कुटुंबातसोबत असतानादेखील मास्क घाला. तुमच्या घरात इतर लोकांना बोलवू नका. संक्रमित व्यक्तीने घरात मास्क घालावे. याशिवाय घरातील इतर सदस्यांनीही घरात मास्क घालावे. याशिवाय संक्रमित व्यक्तीला स्वतंत्र खोलीत वेगळे ठेवले पाहिजे. (वाचा - Coronavirus: भारताला काही आठवड्यांत अतिरिक्त 5 लाख आयसीयू बेड, 2 लाख नर्सेस आणि 1.5 लाख डॉक्टर्सची गरज आहे; ज्येष्ठ सर्जन Dr Devi Prasad Shetty यांचा अंदाज)
कोविड- 19 चा मुकाबला करण्यासाठी लसीकरण मोहिमेचे महत्त्व सांगताना वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, "सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपण कोविड लसीकरणाची गती कमी होऊ देऊ शकत नाही. खरं तर लसीकरण वाढवायला हवं."
मासिक पाळीच्या वेळी महिलांनी ही लस घेता येते का? असा प्रश्न विचारल्यानंतर पॉल म्हणाले, होय. या काळात लस घेता येते. त्यामुळे लसीकरण पुढे ढकलण्याचे कोणतेही कारण नाही. यावेळी त्यांनी पुढे हॉस्पिटल व डॉक्टरांना टेलिमेडिसिनच्या सेवा सुधारण्याचे आवाहन केले. आजपर्यंत 14.19 कोटी लस डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.