पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे शुक्रवारी सकाळी गुजरातमध्ये आगमन झाले. जिथे त्यांनी नवसारी (Navsari) येथे अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधान अहमदाबादला (Ahmedabad) देखील भेट देणार आहेत आणि 3,050 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करतील, असे त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या दोन दशकांत राज्यात झपाट्याने झालेला विकास हा गुजरातचा अभिमान आहे. गेल्या आठ वर्षांत सबका साथ, सबका विकास या मंत्राचा अवलंब करत आमच्या सरकारने राज्यातील लोकांच्या कल्याणावर सर्वाधिक भर दिला आहे, असे पंतप्रधान मोदींनी नवसारी येथील कार्यक्रमादरम्यान सांगितले.
पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला आणि म्हटले की, देशात दीर्घकाळ सत्तेत असलेल्यांनी आदिवासी भागाच्या विकासात कधीच रस घेतला नाही. कारण त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. ते म्हणाले की, मी मतांसाठी किंवा निवडणुका जिंकण्यासाठी विकासकाम सुरू करत नाही, तर ते लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी करतो. खुडवेल येथे 3,050 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हेही वाचा Sanjay Raut Tweet: खोट्या गर्वाचे पक्षी जास्त फडफडतात... गरुडाच्या उड्डाणाचा कधीच आवाज येत नाही, संजय राऊतांचे ट्विट चर्चेत
लोकार्पण पंतप्रधान आज नवसारी येथे रुग्णालय, आरोग्य सेवा संकुल आणि शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. नवसारीत मी एएम नाईक हेल्थकेअर कॉम्प्लेक्स, निराली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खरेल एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करेन. नवसारीच्या सर्व प्रकल्पांमुळे दक्षिण गुजरातमधील लोकांना अनेक फायदे होतील. नंतर अहमदाबादमध्ये, ते इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) च्या मुख्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. जे भारताच्या अंतराळ क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अँकरिंग भूमिका बजावेल.
आज पंतप्रधान ज्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत त्यापैकी अनेक प्रकल्प राज्यातील पाणीपुरवठा सुधारण्यावर केंद्रित आहेत. पंतप्रधान तापी, नवसारी आणि सुरत जिल्ह्यांतील रहिवाशांसाठी ₹ 961 कोटी रुपयांच्या 13 पाणीपुरवठा प्रकल्पांचे भूमिपूजन करतील, असे PMO च्या निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान मधुबन धरणावर आधारित अस्टोल प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन करतील, जे सुमारे ₹586 कोटी खर्चून बांधले गेले.
पाणी पुरवठा अभियांत्रिकी कौशल्याचा हा एक चमत्कार आहे. तसेच, 163 कोटी रुपयांच्या 'नल से जल' प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे प्रकल्प सुरत, नवसारी, वलसाड आणि तापी जिल्ह्यातील रहिवाशांना सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी पुरवतील. डिसेंबर 2022 मध्ये राज्याच्या विधानसभेच्या 182 सदस्यांची निवड करण्यासाठी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांचा दौरा आला आहे.