Hydrabad Shocker: पत्नीशी संपत्तीवरून वाद, पतीची गळफास घेऊन आत्महत्या, हैद्राबाद येथील घटना
Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Hydrabad Shocker: हैद्राबाद येथील एका पतीने आपल्या पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवर असताना आत्महत्या  केल्याची धक्कादाययक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. पत्नी माहेरी असताना हा पतीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी आणि पतीचे काही दिवसांपासून संपत्तीवरून वाद झाला होता या गोष्टीवरून त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. शहरातील रचकोंडा पोलिस आयुक्तालयाच्या उप्पल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे.  (हेही वाचा- बिहारमध्ये दोन हल्लेखोरांचा भररस्त्यात दुकानदारावर गोळीबार, आरोपी फरार, हत्तेचं कारण अस्पष्ट)

मिळालेल्या माहितीनुसार, उप्पल परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने पत्नीसोबत व्हिडिओ कॉल करत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. नरेश असं तरुणाचे नाव होते. उप्पल परिसरातील सरस्वती कॉलनीत राहणारा नरेश याने घरी कोणी नसताना गळफास लावला. त्याची पत्नी नित्याश्री ही काही दिवसांपूर्वी तिच्या माहेरी गेली होती. ती गरोदर असल्याने माहेरी कार्यक्रमानिमित्त गेली होती.  नगेश हा मेट्रोच्या सिग्नलिंग विभागात काम करायचा. काही दिवसांपूर्वी दोघांचे ही संपत्तीवरून भांडण झाले होते.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश आणि नित्याश्रीचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते.  संपत्तीवरून दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात नरेश नैराश झाला आणि टोकाचे पाऊल उचलले. पत्नीशी व्हिडिओ कॉलवरत त्याने छताच्या पंख्याला कापड बांधून गळफास लावून घेतला होता. व्हिडिओ कॉलवर नित्याश्री प्रचंड घाबरली होती, त्याला अनेक विनवण्या केल्या परुंतु नरेशने एकही ऐकले नाही. नित्याश्रीच्या कुटुंबियांनी पोलिसांना खबर दिली. पोलिस घटनास्थळी पोहचे पर्यंत उशीर झाला, नरेशचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.