Bihar Shocker: बिहारमध्ये दोन हल्लेखोरांचा भररस्त्यात दुकानदारावर गोळीबार, आरोपी फरार, हत्तेचं कारण अस्पष्ट

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील रामबार चौकात बुधवारी एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे.

Bihar Shocker: बिहारमध्ये दोन हल्लेखोरांचा भररस्त्यात दुकानदारावर गोळीबार, आरोपी फरार, हत्तेचं कारण अस्पष्ट
Shot Dead In Bihar

Bihar Shocker: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील रामबाग  चौकात बुधवारी एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. आफ्रोश खत्री असं घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो रामबाग चौकाटील मटण दुकानाचा मालक होता. दुकानाकडे जात असताना दोन दुचाकीस्वारांनी त्याच्याजवळ येऊन गोळीबार केला. यात पीडितेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोघांनी मटण दुकानाच्या मालकावर गोळीबार केला. रामबाग चौकात भररस्त्यात ही घटना घडली. हल्लेखोरांनी दोन वेळा पीडितेवर गोळीबार केला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि स्थानिक रहिवाशांनी व्यापाऱ्यांना बाजार बंद करण्यास भाग पाडले आहे. त्यांनी रास्ता रोको करून टायर जाळले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

गोळीबाराचा व्हिडिओ पाहा

परिसरात हल्लेखोरांची दहशत पसरत चालली असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण होत आहे.  पोलिसांना घटनेची माहिती देताच, घटनास्थळी धाव घेतला. मृत व्यक्तीची ओळख पटवून घरच्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. हत्तेचं कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे पोलिस कुटुंबापासून सर्वकडे चौकशी करत आहे. हल्लेखोर आणि कट रचणाऱ्यांबाबत काही सुगावा मिळण्यासाठी आम्ही कुटुंबीयांचे जबाब घेत आहोत. अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2023 02:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).