
(Hyderabad) येथे डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन तिची हत्या केलेल्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केला. एकीकडे आरोपींना मिळालेली शिक्षा योग्य असल्याचे बोलले जात आहे तर, दुसरीकडे या एन्काउंटर काहींनी विरोधही दर्शवला होता. यातच एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या एका आरोपीच्या पत्नीने सरकारकडे अजब मागणी केली आहे. संबधित महिलेने सरकारकडे 10 लाख रुपये आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे. आरोपीच्या पत्नीने केलेल्या मागणीचा अनेकांना धक्का बसला आहे.
हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीचा बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण देशाभरातून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली आणि चौकशीसाठी त्यांना घटनास्थळी घेऊन गेले होते. परंतु, त्यावेळी आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांना नाईलाजाने त्यांचा एन्काउंटर करावा लागला. मात्र, या चौघांपैकी एक आरोपी चिन्नाकेशवुलुच्या गर्भवती पत्नीने सरकारकडे अनोखी मागणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चिन्नाकेशवुलुची गर्भवती पत्नी म्हणाले की, "मी आता माझ्या पतीला मागत नाही. आता त्याचा मृत्यू झाला आहे. पण सरकारने मला माझ्या गावात रोजगार उपलब्ध करुन दिल्यास मी माझ्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करु शकेन. तसेच आरोपींच्या आई-वडिलांनाही एकुलता एक मुलगा गमवल्याची भावना व्यक्त केली आहे. आता सरकारने त्यांना एक प्लॅट आणि 10 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत", अशी मागणी तिने केली आहे. हे देखील वाचा- Hyderabad Rape Accused Encounter: हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी तेलंगणा पोलिसांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, जया बच्चन, स्वाति मालिवाल यांच्यावरही कारवाईची मागणी
तेलंगणा पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवा, नवीन, चिन्नाकेशवुलु आणि मोहम्मद या चौघांना एन्काऊंटर करुन ठार मारले. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न होता. या वेळी आरोपींनी पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचाही प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपींचा मृत्यू झाला.