Hyderabad Rape Accused Encounter: हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी तेलंगणा पोलिसांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, जया बच्चन, स्वाति मालिवाल यांच्यावरही कारवाईची मागणी
Site where the rape accused were 'encountered' | (Photo Credits: ANI)

हैदराबाद (Hyderabad) महिला डॉक्टरवर रेप हत्या प्रकरणातील सर्वच्या सर्व चारही आरोपींना तेलंगणा पोलिसांनी एन्काऊंटर (Encounter) मध्ये मारले. पोलिसांच्या या कामगिरीवर एकाबाजूला कौतुकाचे वर्षाव होत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला टीकेचा वर्षावही होत आहे. देशभरातील अनेक मान्यवरांनी तेलंगणा पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याच मुद्द्यावर तेलंगणा पोलिसांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही शनिवारी दाखल करण्यात आली. ही घटना आणि हैदराबाद पोलिसांची भूमिका या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाचे समर्थन करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) आणि आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल (Swati Maliwa) यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

वकील जीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थीत करत सर्वच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कारवाईवेळी पोलिसांनी न्यायालयाने 2014 मध्ये दिलेल्या आदेशांचे पालन कले नाही. त्यामुळे एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा (एफआयआर) दाखल करावा तसेच, या प्रकरणाची चौकशी करावी. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर सोमावीर सुनावणी करणार आहे.

दरम्यान, याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आणिखी एक याचिका दाखल झाली आहे. वकील मनोहर लाल शर्मा यांनी ही याचिका न्यायलयात दाखल केली आहे. शर्मा यांनी त्या लोकांनाही या याचिकेच प्रतिवादी बनवले आहे ज्यांनी एक्ट्रा ज्युडीशल किलींगचे समर्थन केले होते. यात समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांचीही नावे आहेत. त्यांनी मीडियावरही गँग ऑर्डरची मागणी केली आहे. शर्मा यांनी आपल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निरिक्षणाखाली SIT चौकशीची मागणी केली आहे. (हेही वाचा, Hyderabad Rape And Murder Case: एन्काऊंटर झालेल्या आरोपींचे मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा स्पष्ट नकार)

एएनआय ट्विट

तेलंगणा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी बलात्कार प्रकरणातील आरोपी शिवा, नवीन, केशवुलु आणि मोहम्मद या चौघांना एन्काऊंटर करुन ठार मारले. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी आरोपींनी पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपींचा मृत्यू झाला.