Visuals from the incident. (Photo/ANI)

रस्त्यावरून भरघाव वेगाने निघालेल्या एका ऑडी कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक (Road Accident) दिली आहे. या धडकेत रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना हैदराबाद (Hyderabad) शहरातील सायबराबाद (Cyberabad) भागातील रस्त्यावर 27 रोजी पहाटे घडली आहे. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी ऑडी कारचालकासह तिघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात हिट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून कशाप्रकार ऑडी कारने रिक्षाला धडक दिली? हे खालील व्हिडिओत दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या सायबराबाद येथील परिसरात इनॉर्बिट मॉलजवळच्या रस्त्यावर भरघाव वेगाने निघालेल्या एका ऑडी कारने रिक्षाला माठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या धडकेने रिक्षा एखाद्या खेळण्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. यात रिक्षाचालकासह प्रवाशी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात दाखल करण्याआधीच प्रवाशाचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. हे देखील वाचा-Uttar Pradesh Rape: सांभाळ जिल्ह्यातील 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार; घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल

एएनआयचे ट्वीट-

या घटनेनंतर पोलिसांनी ऑडी कारचालकासह त्याचे वडिल आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. तसेच आरोपीने मद्यप्राशन केले असून एका पार्टीतून तो पुन्हा ज्युबिली हिल्सकडे निघाला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.