सर्वोच्च न्यायालय (Photo Credits: PTI/File Image)

पत्नीला मारहाण एका व्यक्तीची एका व्यक्तीची अटकपूर्व जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली आहे. या व्यक्तीवर आपल्याच पत्नीला मारहाण करण्याचा आरोप आहे. याप्रकरणाची सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. एवढेच नव्हेतर, पत्नीला पतीच्या कुटुंबियातील इतर कोणत्याही सदस्याकडून दुखापत झाली, तरी त्याला पतीच जबाबदार धरले जावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे हे दुसरे लग्न आहे. तर, तिच्या पतीचे हे तिसरे लग्न आहे. या दाम्पत्यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना एक मुल झाले. परंतु, या महिलेला गेल्यावर्षी जून महिन्यात तिच्या नवऱ्यासह सासरच्या सदस्यांनी हुंड्यासाठी मारहाण करण्यात आली होती. यासंदर्भात या महिलेने लुधियाना पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणाची सुनावणी करत असताना सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, सासरी पत्नीला झालेल्या कोणत्याही दुखापतीसाठी पती स्वतःच जबाबदार असणार आहे. तसेच सासरच्या घरात कोणी दुसर्‍या नातेवाईकानंही महिलेवर हल्ला केला, तरी तिची प्राथमिक जबाबदारी पतीवर असणार आहे. हे देखील वाचा-Madhya Pradesh: रेल्वे स्टेशनवर शौचालयाच्या पाण्याने भरली पिण्याची पाण्याची टाकी; स्टेशन मास्टर निलंबित

महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या पतीच्या वडिलांनी तिला बॅटने मारले होते. यावर सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, महिलेला पतीने किंवा सासरच्या कोणत्याही व्यक्तीकडून मारहाण होते. तेव्हा तेव्हा ही पूर्ण प्राथमिक जबाबदारी तिच्या पतीची आहे.