Kerala Accident: सिग्नल वरून वळण घेताना भरधाव बसची कारला भीषण धडक, थरकाप उडवणारा Video व्हायरल
Accident Video Kerala PC TWITTER

Kerala Accident: केरळच्या पलक्कडमध्ये भीषण अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कारला वेगवान येणाऱ्या बसने जोरात धडक दिली आहे. या अपघातात (Accident) नेमके मृतांची संख्या किंवा जखमींची संख्या याबाबत कोणतीही पृष्टी मिळालेली नाही. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ नागरिकांनी गर्दी केली होती. (हेही वाचा- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाइन-3 पुढील आठवड्यात ट्रायलसाठी सज्ज

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, सिग्नल वरून कार बाजूला वळण घेत होती परंतु तेवढ्यात एक बस वेगाने कारच्या जवळ आली आणि धडक दिली. बस अनियंत्रित झाल्याने ही जोरात धडक बसली.  हा अपघात जवळच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ही धडक इतकी भीषण होती की, यात कारचा चक्काचूर झाला आहे. बसचा समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

X वर एका वापरकर्त्याने हा अपघाताचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याने दावा केला आहे की, सिग्नल असताना कार वळली आणि हा अपघात झाला. त्यामुळे कार रस्त्यावर आल्याने बस चालकाला वेगावर नियंत्रण उरलाच नाही आणि जोरात धडक झाली. नेटकऱ्यांनीही अपघातात पूर्णपणे कारच्या चालकाला दोषी ठरवले. अपघाताचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे.