Trains Derailed In Jabalpur: ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातानंतर आता मध्य प्रदेशातील जबलपूर (Jabalpur) रेल्वे विभागात दोन रेल्वे अपघात झाले आहेत. 6 जून रोजी रात्री 7.30 च्या सुमारास कटनी येथील रेल्वे यार्डात मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले. एकाच दिवसात दोन अपघात झाले. या घटनेनंतर बरोबर चार तासांनी म्हणजे रात्री 10.30 वाजता भेडाघाटाजवळ भिटोनी येथे गॅसने भरलेली मालगाडी रुळावरून घसरली. एकाच दिवसात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर विभागातील रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
अपघातानंतर जबलपूर रेल्वे विभागाच्या नियंत्रण कार्यालयात उपस्थित अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मालगाडीच्या एलपीजी रेकच्या दोन बोगी 6 जूनच्या रात्री रुळावरून घसरल्या. दरम्यान, मुख्य मार्गावरील रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मुख्य मार्गावर रेल्वेची वाहतूक सामान्य आहे. (हेही वाचा - Wrestlers' Protest: 'आम्ही चर्चेसाठी तयार', केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कुस्तीपटूंना निमंत्रण; खेळाडूंच्या भूमिकेकडे क्रीडावर्तूळाचे लक्ष)
Jabalpur News : भिटोनी की लूप लाइन में गैस से भरा वैगन पटरी से उतरा#JabalpurNews #MadhyapradeshNews #Bhitoni #मालगाड़ी #भेड़ाघाटhttps://t.co/tjuQ5EzXSZ pic.twitter.com/2LtDxGfI0C
— NaiDunia (@Nai_Dunia) June 7, 2023
सीपीआरओ पश्चिम मध्य रेल्वेने सांगितले की, रात्री कोणतेही काम झाले नाही. साईडिंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूर्योदयानंतर मालगाडी रुळावर आणण्याचे काम सुरू झाले.