West Bengal Flood: मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमध्ये आला पूर; 2 लाखांहून अधिक नागरिकांचे स्थालांतर, पाहा फोटो
Floods Situation | (Photo Credits: ANI)

West Bengal Floods Update: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) राज्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या धरणांमधील सोडावे लागले आहे. ज्यामुळे या परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने अनेक घरे पाण्याखाली गेले आहे. तसेच नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, भारतीय वायु दलाने बचावकार्य सुरू केले आहे. दोन लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

लष्कर, एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या खानाकुल ब्लॉक 2 च्या प्रभावित भागात भारतीय हवाई दलाचे बचावकार्य सुरू आहे. भारतीय हवाई दलाने छतावर अडकलेल्या 31 जणांची सुटका केली आहे. तसेच त्यांना हेलिकॉप्टरद्वारे आरामबागमधील सुरक्षित ठिकाणी हलवलण्यात आले आहे. याव्यतिरिक्त भारतीय लष्कर हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्न पुरवठा देखील करत आहे. हे देखील वाचा- Train Accident: तेलंगणामध्ये पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव, घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

फोटो-

West Bengal Floods (Photo Credit: ANI)
West Bengal Floods (Photo Credit: ANI)

फोटो-

West Bengal Floods (Photo Credit: ANI)
West Bengal Floods (Photo Credit: ANI)

फोटो-

West Bengal Floods (Photo Credit: ANI)
West Bengal Floods (Photo Credit: ANI)

फोटो-

West Bengal Floods (Photo Credit: ANI)
West Bengal Floods (Photo Credit: ANI)

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूर्व बर्धमान, पश्चिम बर्धमान, पश्चिम मेदिनीपूर, हुगली, हावडा आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांच्या विविध भागात पूर आला आहे. यामुळे अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे.