Train Accident: तेलंगणामध्ये पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव, घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Railway (pic credit - ANI Twitter)

देशात दररोज रेल्वे अपघात (Railway Accident) होतात. यामध्ये अनेक लोकांचे जीव जात आहेत. यातील काही अपघात रेल्वे स्टेशनवर (Railway Station) झाले आहेत. यातील पोलिसांच्या (Police) प्रसंगावधानामुळे अनेक प्रवासी लोकांचे जीव वाचले आहेत. दरम्यान अशीच एक घटना तेलंगणामध्ये (Telangana) घडली आहे. तेलंगणाच्या सिकंदराबाद (Sikandarabad) येथील एका भारतीय रेल्वे कॉन्स्टेबलने (Constable) चालत्या ट्रेनमध्ये (Train) चढताना एका महिलेला डबा आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात पडण्यापासून वाचवले आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) रेल्वे स्टेशनच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली घटना शेअर केली. आयुष्य हे बॉलिवूड चित्रपटाच्या दृश्यासारखे नाही. हे खूपच मौल्यवान आहे. आरपीएफच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी वेळीच कारवाई केल्यामुळे ती आज सुदैवाने बचावली. चालत्या ट्रेनमध्ये चढू नका. सतर्क राहा. सुरक्षित राहा. असे या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने ट्विट केले आहे.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे (RPF) कॉन्स्टेबल दिनेश सिंग यांचे महिलेला वाचवल्याबद्दल कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये ती महिला ट्रेनवर उडी मारण्याचा प्रयत्न करते, नंतर घसरते आणि डब्यात आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकते. तिला चालत्या ट्रेनने ओढले जात असताना सिंह, जो पुढे जात होता. तिला परत प्लॅटफॉर्मवर खेचतो. ती नंतर उठते आणि इतरांच्या मदतीने हळू हळू निघून जाते. असे त्यात दिसत आहे.

31 जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून अशीच घटना घडली होती. एक माणूस प्रयागराज स्थानकातून निघणाऱ्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे पाय ट्रेन आणि प्लॅटफॉर्म दरम्यानच्या दरीमध्ये अडकले. वेगवान ब्रह्मपुत्रा स्पेशलने त्याला ओढले. कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ कॉन्स्टेबलने त्वरीत कारवाई केली आणि त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर खेचले आहे.

आरपीएफ कॉन्स्टेबलच्या प्रयत्नांचे कौतुक करताना त्यावेळचे रेल्वे मंत्री असलेले पीयूष गोयल यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना हवालदाराच्या धाडसाचे कौतुक केले आहे. गेल्या महिन्यात आणखी एका आरपीएफ कॉन्स्टेबलने मुंबईच्या कुर्ल्यातील लोकमान्य टिळक टर्मिनसवर एका व्यक्तीची सुटका केली. जो चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना घसरला. असे अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी प्रवासी लोकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.