Hathras Gangrape Case: प्रशासनाकडून सत्य दडपण्याचा प्रयत्न; हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या भावाचा आरोप
Hathras rape victim cremated on Wednesday | (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. 19 वर्षीय पीडित 14 सप्टेंबरला गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेली असताना तिच्यावर बलात्कार करून तिला जबर मारहाण करण्यात आली होती. ज्यामुळे उपचारादरम्यान 29 रोजी पीडित तरूणीचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी परस्पर या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुरु असलेल्या तपासणी बाबत आम्ही समाधानी नाही. तसेच अद्यापही आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. महत्वाचे म्हणजे, आम्हाला उघडपणे धमकी देणाऱ्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अजूनही निलंबित करण्यात आले नाही, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना नको त्या पद्धतीने धमकी देणारे जिल्हा दंडाधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पीडितेच्या कुटुंबियांना अपेक्षित होते. मात्र, जिल्हा दंडाधिकारी प्रविण कुमार यांना अद्यापही निलंबित करण्यात आलेले नाही, असा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Hathras Gangrape Case: राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह 5 जणांना हाथरसला जाण्यास परवानगी, उत्तर प्रदेश सरकारचे प्रशासन एक पाऊल मागे

एएनआयचे ट्विट-

हाथरस सामूहिक बलात्कारचे प्रकरणांवरून विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरस पोहचले आहेत. मात्र, केवळ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाच पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाऊ दिले आहे.