मंदिरातील कार्यक्रमात खाद्यपदार्थांसोबत दारुच्या बाटल्यांची सोय, भाजप नेत्याचा संतप्त प्रकार उघडकीस
भाजप नेत्याकडून दारु वाटप (फोटो सौजन्य- ANI)

लखनौ (Lucknow) येथे मंदिराच्या कार्यक्रमावेळी खाद्यपदार्थांसोबत दारुच्या बाटल्यांची सोय केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामध्ये भाजप नेते नरेश अग्रवाल यांच्या मुलाचा हात असल्याचे सांगितले जात आहे. तर कार्यक्रमाच्यावेळी अग्रवाल हे स्वत: उपस्थित असून ही अशा पद्धतीचा प्रकार घडला आहे.

उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) हरदोई (Hardoi) येथील एका मंदिरात नरेश अग्रवाल (Naresh Agarwal) यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी अग्रवाल यांच्या मुलगा नितिन हा तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना खाद्यपदार्थांचे वाटप करत होता. मात्र या खाद्यपदार्थांचे पाकिट उघडून पाहिल्यास त्यात दारुच्या बाटल्यांची सोय केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकराची माहिती भाजपचे खासदार अंशुल वर्मा (BJP MP Anshul Verma) यांनी वरिष्ठांकडे देणार असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा- भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये गोळी झाडून हत्या)

नरेश अग्रवाल हे समाजवादी पक्षाचे नेते होते. त्यांनी 2018 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला. तसेच 38 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नरेश अग्रवाल यांनी जवळजवळ चार वेळा पक्ष बदल केले आहेत.