वस्तूंवरील 28% GST ची कपात होणार - अरुण जेटली यांचे विधान
Finance Minister Arun Jaitley (Photo Credits: ANI)

येत्या काही दिवसातच सर्व वस्तूंवर कर आकारला  जाणार आहे. त्याचबरोबर 28% जीएसीटी(GST) लागू केलेल्या वस्तूंवरील कर काढून टाकण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी म्हटले आहे.

देशामध्ये 5%, 12%, 18% आणि 28% अशी चार टप्प्यामध्ये जीएसटीचा कर आकारला जातो. तर 12% आणि 18% सुवर्णमध्य जीएसटी आकारणी होणार आहे. मात्र येत्या काही दिवसात जीएसटी ही तीन टप्प्यात आकारली जाणार असल्याचे जेटली यांनी त्यांच्या ब्लॉग मधून सांगितले आहे. शून्य, 5% व उच्च किंमतीच्या वस्तूंवरील जीएसीटीसाठी आणखी एक टप्पा असे तीन टप्पे ठेवण्यात येणार आहेत.

जीएसटीमधील 28% कर हा सर्वात जास्त टप्पा असल्याचे सांगितले जाते. तर आलिशान वस्तूंवरील 28% जीएसटी कर हा 18% करण्यात आलेला आहे.